मुंबई

शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक पूल पाण्यात, जाणून घ्या स्थिती

खर्डी-वाडा रस्त्यावरील मोरी वाहून गेल्याने येथील 25 गावांचा संपर्क तुटला असून येथील रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे.

नरेश जाधव : सकाळ वृत्तसेवा

शहापूर: गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील (shahpur area) मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा (tansa) व मोडकसागर (modak sagar) धरण रात्री भरून वाहू लागले आहेत. तालुक्यातील अंतर्गत गावांना (villages) जोडणारे पूल पाण्याखाली गेल्याने येथील गावांचा संपर्क तुटला आहे, तर मध्य रेल्वे वरील खर्डी-कसारा दरम्यान असलेल्या उंबरमाळी येथील स्थानकाचा भाग खचल्याने रेल्वे वाहतूक बंद झाली होती. (In shahpur area many bridges are under water becasue of heavy rain dmp82)

या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने कामा शिवाय कोणीही बाहेर निघू नये असे आवाहन तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी केले आहे. खर्डी-वाडा रस्त्यावरील मोरी वाहून गेल्याने येथील 25 गावांचा संपर्क तुटला असून येथील रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. खर्डी-जरंडी,खर्डी-तलेखण,खर्डी-चांदा,खर्डी-वैतरणा वरील बागेचा पाडा येथील मोरी खचली,अल्याणी येथील अर्धे गाव पाण्यात, शहापूर -मुरबाड वरील पूल खचला असल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली असून येथील वाहनांना कल्याण येथून 60 किमी वळसा घालून मुरबाड येथे जावे लागत आहे.

कसारा-खर्डी दरम्यान असलेल्या उंबरमाळी स्थानकात पूर्ण पाणी भरून स्थानक खचल्याने रेल्वे वाहतूक रात्री पासून ठप्प होती. कसारा येथे थांबलेल्या 2 हजाराच्या आसपास एक्सप्रेस मधील प्रवाशांना कसारा येथून बसच्या सहाय्याने त्यांच्या इच्छित स्थळी पोहचविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनची टीम व स्थानिक पोलीस प्रशासनाने मदत केली. अमरावती एक्सप्रेस मधील प्रवाशांना रात्री खर्डीतच मुक्काम करावा लागला.

वाडा-खर्डी दरम्यान असलेली मोरी दोन दिवसांपूर्वी खचली होती परंतु कालच्या पावसात ही मोरी पूर्ण वाहून गेल्याने वाडा-खर्डी मधील 25 गावांचा संपर्क तुटला असून येथील वहातुक पूर्णपणे बंद झाल्याने चाकरमानीचे हाल झाले आहेत.

मोडकसागर व तानसा ओव्हरफ्लो-

धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई मनपाच्या तानसा व मोडकसागर ही दोन्ही धरणे पहाटे तुडुंब भरुन वाहू लागली आहेत. पुराचा धोका होऊ शकतो त्यामुळे धरणाखालील 33 गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. भातसा धरण आज सकाळी 6 वाजेपर्यंत 64 टक्के भरले असून 127.60 मी पाण्याची पातळी असून पाऊस असाच सुरू राहिल्यास 4/5 दिवसात धरण भरण्याची शक्यता असल्याचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी सांगितले.

"तालुक्यात ठिकठिकाणी अनेक पूल पाण्यात गेले असून अनेक नागरिकांचा संपर्क तुटला असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून व अतिवृष्टी होत असल्याने नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर निघू नये व आपली काळजी घ्यावी" नीलिमा सूर्यवंशी, तहसीलदार, शहापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT