IT Raid On Shivsena Leader Yashwant Jadhav e sakal
मुंबई

यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता जप्त, IT कडून धडक कारवाई

सकाळ डिजिटल टीम

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने यामागे राजकीय षडयंत्र असल्याचं सेनेच्या नेत्यांनी म्हटलं होतं.

यानंतर राजकीय वातावरणही तापलं. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. त्यानंतर यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता बळावली आहे. (Yashwant Jadhav IT Raid) आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या आणि परिवाराच्या ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत.

या मालमत्तांमध्ये त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांच्याशी संबंधित मालमत्तांवरही कारवाई झालीय. जप्त केलेल्या ४१ मालमत्तांमध्ये बिल्कवडी चेंबर बिल्डींगमधील ३१ फ्लॅट, भायखळा येथील इंपिरिकल क्राऊन हॉटेल आणि वांद्रे येथील एका फ्लॅटचा समावेश असल्याचं कळतंय. यशवंत जाधव यांनी महापालिकेत ज्या कंपन्यांना कंत्राट दिली त्याचीही आयकर विभागाने चौकशी केली.

या चौकशीत जाधव परिवाराने प्रधान कंपनीला कर्जाची परतफेड म्हणून दिलेले पैसे हे विविध मार्गांनी फिरवून कंत्राटदार बिमल अग्रवालच्या कंपनीत आल्याचं समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील पैशांमधून यशवंत जाधव यांनी आपल्या सासुबाई सुनंदा मोहिते यांच्या नावावर भायखळा परिसरात इंपेरिकल क्राऊन नावाचं हॉटेलही खरेदी केल्याचं समोर आलं आयकर विभागाने यशवंत जाधव यांचा मेव्हणा आणि पुतण्यायांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. मात्र ते हजर राहिलेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

Constitution Day 2024 : संविधान दिन साजरा करताय ? आधी आपल्या जबाबदाऱ्या जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

Accident: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Goodbyes are never easy! ऋषभ पंतची पोस्ट व्हायरल; लिलावात २७ कोटी मिळाल्यानंतर नेमकं असं का म्हणतोय?

SCROLL FOR NEXT