IT Raid On Shivsena Leader Yashwant Jadhav e sakal
मुंबई

BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई, सेना नेत्याच्या घरावर IT ची छापेमारी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेत्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत का? अशा चर्चांना उधाण आले आहे. (Income Tax Raid on Yashwant Jadhav)

यशवतं जाधव हे मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या घरावर आयटीने आज सकाळीच छापेमारी केली आहे. त्यांच्या घरासमोर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता.

एवढेच नाही तर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर ही कारवाई झाल्याचं बोललं जात आहे. त्यांनी काही बोगस कंपन्यांद्वारे मनी लाँडरींग केल्याचा आरोप झाला होता. याचप्रकरणी ही कारवाई केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जावध यांच्या दुसऱ्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली.

यशवंत जाधव यांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी -

यशवंत जाधव यांचे निकटवर्तीय आणि माझगाव विभाग संघटक विजय लिपारे यांच्या काळाचौकीच्या घरी सुद्धा आयकर विभागाची टीम दाखल असल्याचं कळतंय. त्यांच्या घरी देखील छापेमारी सुरू आहे.

कोण आहेत यशवतं जाधव? -

यशवंत जाधव हे शिवसेना उपनेते आहेत . बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आहेत . त्यांच्या पत्नी यामिनी यशवंत जाधव या भायखळा मतदार संघाच्या आमदार आहेत

राजकीय कारकीर्द -

  1. १९९७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड

  2. २००७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले

  3. २००८: बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षपदी निवड

  4. २०११ नंतर: उपनेते, शिवसेना

  5. २०१७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवड

  6. २०१७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत सभागृह नेते म्हणून नियुक्ती

  7. २०१८: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड , एप्रिल २०१८ पासून यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्ष आहेत , ही स्थायी समिती अध्यक्ष पदाची त्यांची ३ टर्म आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT