criminal sakal media
मुंबई

मुंबईत वरिष्ठ पोलिसांकडून ऑपरेशन ऑलआऊट ; 235 गुन्हेगारांची तपासणी

524 धार्मिक व संवेदनशिल ठिकाणांची तपासणी

अनिष पाटील

मुंबई : स्वातंत्र दिनाच्या (independence day) पार्श्वभूमिवर शुक्रवारी मध्यरात्री (friday midnight) शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबवले असून त्यात मुंबई पोलिसांचे (Mumbai police) सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत 1235 सराईत गुन्हेगारांची तपासणी (criminal testing) करण्यात आली. यावेळी 524 धार्मिक व संवेदनशिल ठिकाणांची (religious place) तपासणी करण्यात आली. तसेच 230 ठिकाणी कोबिंग ऑपरेशन राबवण्यात आले.

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमिवर मुंबई पोलीसांनी शुक्रवारी मध्यरात्री सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन राबवले. सह पोलीस आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था ) विश्वास नांगरे पाटील व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व मुंबई पोलीस ठाण्यात ही कारवाई पार पाडली. सर्व 5प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, सर्व 13 परिमंडळ विभागांचे पोलीस उपायुक्त, सर्व विभागांचे सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहिले आणि त्यांनी ऑपरेशनचे वैयक्तिक निरीक्षण केले. प्रत्येक पोलीस ठाण्यांमधुन जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.

प्रत्येक कार्य करण्यासाठी समर्पित वैयक्तिक टिमसह अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी , संशयास्पद व्यक्ती व क्रियांसाठी हॉटेल्स, लॉजेस आणि मुसाफिरखानांची तपासणी, संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू जसे की शस्त्रे, ड्रग्स, इ. म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तू, शोधण्यासाठी नाकाबंदीचे व कोम्बिंग ऑपेरशन चे आयोजन, फरार आणि पाहिजे व्यक्तींना अटक करणे,प्रलंबित अजामीनपात्र वारंट आणि स्थायी वारंटची बजावणी,अवैध दारू, जुगार ई. अशा बेकायदेशीर क्रियांवर कारवाई, पोलीस दृश्यमानता वाढविण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि संवेदनशील भागात पायी गस्त ही कामे या ऑपरेशन अंतर्गत हाती घेण्यात आली होती.

ऑलआउट मध्ये पुढील कारवाई करण्यात आली

1) मुंबई पोलीसांच्या अभिलेखावरील 79 आरोपींना अटक करण्यात आले आहे.

2) 32 अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपीतांना अटक करण्यात आली.

3) अंमली पदार्थ खरेदी/विक्री करणा-या 121 व्यक्तींवर अंमलीपदार्थ विरोधी कायदा अन्वये अटकेची कारवाई करण्यात आली.

4) अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकुण 37 जणांवर कारवाई करून 2 अग्निशस्त्रे व 35 चाकू, तलवारी इ. शस्त्रे जप्त करण्यात आली.

5) अवैध दारू विक्री /जुगार इ.अवैध धंदयांवर 48 ठिकाणी छापे टाकून, अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले.त्यामध्ये 80 आरोपींवर कारवाई करण्यात आली..

6) मुंबई शहराबाहेर हद्दपार केलेले, पंरतु मुंबई शहरातऑपरेशन ऑल आऊट दरम्यान विना परवाना प्रवेश केलेले एकुण 46 तडीपार इसमांवर मपोका. कलम 142 अन्वये कारवाई करण्यात आली

7) महाराष्ट्र (मुंबई ) पोलीस कायदयाचे कलम 120. 122 व 135 अन्वये संशयितरित्या वावरणारे एकुण139 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून 148 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.

8) मुंबई शहरात एकुण 230 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले , त्यामध्ये अभिलेखावरील 1235 आरोपी तपासण्यात आले . त्यामध्ये 382 आरोपी मिळून आले. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.

9) सर्व पोलीस ठाण्यांचे हददीत एकुण 139 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती.

1. त्यामध्ये एकुण 9661 दुचाकी/चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.

2. मोटारवाहन कायदयान्वये 1946 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

3. कलम 1185 मो.वा.का. अन्वये 10 मध्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली

10) बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने एकुण 869 हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली.

11) प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने धार्मिक व संवेदनशिल ठिकाणे एकुण 524 तपासणी करण्यात आले.

12) बृहन्मुंबई शहरामध्ये 1990 शासकिय व खाजगी ठिकाणी ध्वजारोहन होणार असून 884 ठिकाणाची ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान तपासणी करण्यात आली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Shri Thanedar: ट्रम्प लाट असूनही मराठमोळ्या नेत्याने उधळला विजयाचा गुलाल! दुसऱ्यांदा बनले अमेरिकेचे खासदार, कोण आहेत श्री ठाणेदार ?

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

USA Election 2024: राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! सोशल मीडियावर मिम्सचाही पाऊस

Latest Marathi News Updates live: महाविकास आघाडीच्या सभेत जयस्तुते गाण्याच सादरीकरण

SCROLL FOR NEXT