इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया)ची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी संयुक्तपणे या बैठकीचे आयोजन केले आहे. युतीसाठी ही बैठक महत्त्वाची असून समन्वय समिती स्थापन करणे, जागावाटपाचा आराखडा आणि संयुक्त घोषणापत्रावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी युती राज्यनिहाय संयोजकांची नेमणूक केली जाऊ शकते. आघाडीतील एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक राज्यासाठी समन्वयकांची नेमणूक केली जाणार आहे. हा समन्वयक राज्यातील घटक पक्षांशी सल्लामसलत करून आराखडा तयार करेल. त्यानंतर युतीची समन्वय समिती चर्चा करून जागावाटप निश्चित करणार आहे.
जाहीरनाम्यावर लढणार निवडणूक
इंडिया आघाडी मुंबई च्या बैठकीत संयुक्त जाहीरनामा तयार करण्यासाठी एका ज्येष्ठ नेत्याची संयोजक म्हणून नेमणूक करू शकते. ही समिती सर्व पक्षांशी चर्चा करून जाहीरनाम्याचा मसुदा तयार करेल, अशी माहिती एका वरिष्ठ नेत्याने एका वृत्तवाहिनीला दिली. युतीने जाहीरनाम्यावर निवडणूक लढवावी, असा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून भाजपच्या आघाडीतील मतभेद सोडवले जाऊ शकतील असे त्यांनी सांगितले.
यादरम्यान देशवासियांना एकजुटीचा संदेश देण्याबाबतही युती गंभीर आहे. युतीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, या बैठकीत एकतेवरही चर्चा होईल. सरकारविरोधातील कोणत्याही मुद्द्यावर संपूर्ण इंडिया आघाडीने एका आवाजात बोलावे, असा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून लोकांचा युतीवरील विश्वास वाढेल. लोकसभेत दिल्ली सेवा कायदा आणि सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर इंडिया अलायन्सचे सर्व घटक एकवटल्याचे पाहयला मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.