वडाळा : भारतातील प्रमुख बंदरांच्या (Indian Port) मान्यताप्राप्त कामगार महासंघांनी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे इंडियन पोर्ट असोसिएशन (IPA) व नौकानयन मंत्रालयाच्या आदेशानुसार (Ministry of shipping order) सर्व प्रमुख बंदरांचा ५० टक्के व प्रत्येक बंदराचा ५० टक्के या तत्त्वानुसार बोनस (bonus payment) देण्याचे तत्वतः मान्य केले आहे. त्यानुसार मुंबई बंदरातील (Mumbai port workers) कामगारांना १२ हजार रुपये ॲडव्हान्स बोनस ऑक्टोबर २०२१ च्या पगारामध्ये दिला जाणार आहे, असे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज (sudhakar Apraj) यांनी सांगितले.
नौकानयन मंत्रालयाच्या सूचनेप्रमाणे सर्व बंदरांचा २० टक्के व प्रत्येक बंदराचा ८० टक्के या तत्त्वानुसार बोनस दिला जावा, अशी सूचना होती. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिली होती; परंतु २०१९ मध्ये मान्यताप्राप्त फेडरेशन व आयपीए यांच्यामध्ये झालेल्या समझोता करारानुसार २०२०-२१ वर्षाचा बोनस ५०/५० टक्के या तत्त्वानुसार मिळावा, अशी मागणी मान्यताप्राप्त कामगार महासंघांनी केली होती. त्याप्रमाणे बोनस देण्याचे मान्य झाले आहे.
यासाठी पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी लागेल म्हणून दिवाळीपूर्वी बोनसची ॲडव्हान्स रक्कम १२ हजार रुपये ऑक्टोबर महिन्याच्या पगारात दिली जाणार आहे. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर नेमकी रक्कम येईल, त्यानुसार कमी असल्यास उर्वरित रक्कम दिली जाईल व जास्त असल्यास कापून घेतली जाईल. १ जानेवारी २०१७ पूर्वीचे जे पेन्शनर्स आहेत, त्यांना ऑक्टोबर २०२१ च्या पेन्शनमध्ये १० टक्के थकबाकी मिळणार आहे, अशी माहिती युनियनचे मारुती विश्वासराव यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.