Dengue-malaria patients sakal media
मुंबई

मुंबईत 'या' पावसाळी आजारांचा उद्रेक; वर्षभरात 18 टक्के वाढ

मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोना संसर्गासह (corona infection) पावसाळी आजारांनीही (Monsoon diseases) मुंबईकरांना चांगलेच हैराण केले. पावसाळी आजारांनी ग्रस्त रुग्णांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 18 टक्के ( Infectious diseases eighteen percent increases) वाढले आहे. मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोसह, कावीळ आणि एच1एन1 आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. (Infectious diseases increases eighteen percent in a year in Mumbai)

गेल्या वर्षी म्हणजेच 2020 च्या तुलनेत यावर्षी 2021 मध्ये पावसाळी आजारांचे प्रमाण 18 टक्के वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मलेरियाचे 133 , डेंग्यू,744,गॅस्ट्रो 477,कावीळ 38,चिकनगुनिया 78, एच1एन1 20 रुग्ण वाढले. लेप्टो चे रुग्ण कमी 16 रुग्णसंख्या कमी झाले असून मृत्यू कमी झाले आहेत.

गेल्या वर्षी मलेरियाचे एकूण 5007 रुग्ण होते,ते यावर्षी 5140 झाले.डेंग्यू 129 वरून 773,गॅस्ट्रो 2549 वरून 3026,कावीळ 263 वरून 301,चिकनगुनिया शून्यावरून 78,एच1एन1 44 वरून 64 वर पोचले. तर लेप्टोचे रुग्णसंख्या काहीशी कमी होऊन 240 वरून 224 पर्यंत खाली आली आहे. पावसाळी आजारांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्के रुग्णवाढ झाली आहे. त्यात सर्वाधिक डेंग्यू च्या रुग्णसंख्येत 577 टक्के वाढ झाली आहे. त्याखालोखाल चिकणगुनीया 78 टक्के,एच1एन1 46 टक्के, गॅस्ट्रो 19 टक्के,कावीळ 14,मलेरिया 3 टक्के वाढ झाली आहे. मात्र लेप्टोच्या रुग्णसंख्या 7 टक्क्यानी घटली आहे.

यावर्षी मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मृत्यूचे प्रमाण 58 टक्के कमी झाले आहे. मलेरिया 1 वरून शून्य,लेप्टो 8 वरून 4पर्यंत खाली आले आहेत. डेंग्यू चे गेल्या वर्षी आणि याही वर्षी 3 मृत्यू ची नोंद झाल्याने स्थिर आहे. तर चिकनगुनिया,कावीळ,एच1एन1 आणि गॅस्ट्रो चे गेल्या दोनवर्षात एक ही रुग्ण दगावल्याची नोंद नाही.

पावसाळी आजारांचा तुलनात्मक तपशील

आजार 2020 2021 %

मलेरिया 5007 5140 +3

लेप्टो 240 224 -7

डेंग्यू 129 873 +577

गॅस्ट्रो 2549 3026 +19

कावीळ 263 301 +14

चिकनगुनिया 0 78 +78

एच1एन1 44 64 +45

एकूण 8233 9706 +18

पावसाळी आजारांमध्ये काही प्रमाणात वाढ दिसत असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. कोविड काळातील परिस्थिची तुलना यावर्षी करता येणार नाही. कोरोना संसर्गातील उपाययोजनांमुळे आजारांचे प्रमाण नियंत्रणात राहिले.

-डॉ.मंगला गोमारे , कार्यकारी आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT