Mangal Prabhat Lodha statement government will only provide facilities other responsibilities of businessmen mumbai sakal
मुंबई

Ganga Bhagirathi: 'गंगा भागीरथी' प्रकरणी महिला आयोगाचा पुढाकार! मंगलप्रभात लोढांचं स्पष्टीकरण

राज्यातील विधवा महिलांच्या संबोधनासाठी गंगा भागीरथी हा शब्द वापरण्याची शिफारस महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील विधवा महिलांच्या संबोधनासाठी गंगा भागीरथी हा शब्द वापरण्याची शिफारस महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं केली आहे. याबाबतचं पत्र व्हायरल झाल्यानंतर राज्यातील पुरोगामी वर्तुळातून याला कडाडून विरोध करण्यात आला. मोठ्या विरोधानंतर यावर आता महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Initiative by Women Commission on Maharashtra on Ganga Bhagirathi issue says Mangalprabhat Lodha)

लोढा माध्यामांशी बोलताना म्हणाले, "विधवा महिलांच्या संबोधनाबाबत मी पुढाकार घेतलेला नाही. पण संबोधन व्हावं असा प्रस्ताव सर्वांत आधी महिला आयोगानं मंत्रालयाकडे पाठवला होता. दोन-तीन महिला संघटनांनी मला दोन नावं दिली होती. मंत्री म्हणून मी आमच्या मंत्रालयाकडं हा प्रस्ताव पुढे पाठवला आणि त्यावर चर्चा करण्यास सांगितलं. अद्याप त्यावर काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही"

यापूर्वी महिला आयोगानंच विधवा महिलांच्या संबोधनाचा विषय पुढे आणला आहे. यासाठी त्यांनी मंत्रालयाला पत्रही लिहिलं त्यांच्या पत्रात काही संबोधनं सुचवली होती. तसेच इतर दोन तीन महिला संघटनांनी देखील काही संबोधनं सुचवली, त्यामध्ये गंगा भागीरथी हे पण होतं. पण त्यावर अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही किंवा याबाबत जीआरही निघालेला नाही.

हे ही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चाकणकरांना विचारा

महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या विषयी सचिवांना सूचना केल्या आहेत. महिलांच्या सामाजीक आणि आर्थिक प्रश्नांसाठी देखील सरकार प्रयत्न करत आहे. तुम्ही जाऊन रुपाली चाकणकरांना विचारा की ते संबोधन का बदलू पाहत आहेत, असा सल्ला यावेळी लोढांनी पत्रकारांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : मला कोणी गाडू शकत नाही- अब्दूल सत्तार

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT