मुंबई

ठाण्यातील जाहिरात बॅनर होर्डीग्जची चौकशी; अनाधिकृत होर्डींग्जना दणका

राजेश मोरे

ठाणे  ः शहराच्या विविध रस्त्यांच्या कडेला, रस्त्याच्या मधोमध, फुटापाथच्या कडेला, शौचालयांवर सध्या होर्डीग्ज, बॅनरचा विळखा पडला असल्याचा आरोप शुक्रवारी झालेल्या महासभेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केला. यातील किती अधिकृत आणि किती अनाधिकृत आहेत, याची यादी महापालिकेकडे आहे का? असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला. महापौर नरेश म्हस्के यांनी या संदर्भात चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहरातील सर्वच होर्डीग्ज आणि बॅनरचा अहवाल तयार करुन अनाधिकृत असलेल्या होर्डीग्जवर कारवाई केली जाईल असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

शुक्रवारच्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक देवराम भोईर यांनी या मुद्याला हात घातला. कोलशेत, कापुरबावडी आदींसह इतर भागात सध्या रस्त्यांची दुर्दशा करण्यात आली असून सर्वच ठिकाणी होर्डीग्ज लावण्यात आले असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यातील अधिकृत कीती आणि अनाधिकृत कीती असा सवालही त्यांनी केला. याच मुद्याला धरून कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी देखील या मुद्याला हात घालत वर्तक नगर भागातही अशाच पध्दतीने होर्डीग्ज लावण्यात आले असल्याचा आरोप केला. पूण्यात होर्डीग्ज पडून दुर्घटना घडलेली असतांना ठाण्यात अशाच पध्दतीने होर्डीग्ज पडण्याची वाट प्रशासन बघत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केवळ एका मर्जीतील ठेकेदारासाठी शहरातील रस्ते, फुटपाथ, शौचालये जाहीरांतीसाठी आंदन देण्यात आले आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित करुन प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी शहराला घातलेल्या या विळख्याच्या विरोधात आवाज उठवित यामागे कोणाचा हात आहे, असा सवाल केला. अशा अनाधिकृत होर्डीग्ज आणि जाहीरातदारांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यानुसार महापौर नरेश म्हस्के यांनी देखील या अशा जाहीरातदारांसाठी पालिका काम करीत आहे का?, शहरातील किती अधिकृत आणि अनाधिकृत होर्डींग्ज आहेत, याची तत्काळ माहिती देऊन अनाधिकृत होर्डीग्जवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्यानुसार उपायुक्त संदीप माळवी यांनी शहरातील सर्वच होर्डीग्ज आणि बॅनरची चौकशी करुन त्याचा अहवाल तयार केला जाईल त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.  

Inquiry advertising banner hoardings in Thane  

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT