मुंबई: समुद्रसेतू-2 (Samudrasetu-2) मोहिमेत आखाती देशांमधून (Gulf Countries) 40 टन द्रवरूपी ऑक्सिजन घेऊन INS त्रिखंड (INS Trikhand) ही युद्धनौका सोमवारी सकाळी मुंबईत (Mumbai) दाखल झाली. त्यावेळी तिचे स्वागत करण्यासाठी राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हजर होते. ही युद्धनौका 5 मे रोजी कतारच्या (Qatar) हमाद बंदरात गेली होती. तेथून ऑक्सिजनचे क्रायोजनिक कंटेनर घेऊन ती आज मुंबईत दाखल झाली. (INS Trikhand Safely Reached in Mumbai with Liquid Oxygen Cylinders In Presence of Aaditya Thackeray Sonia Barbry)
ऑक्सिजनचे द्रवरूपी कंटेनर फ्रान्सने 'ऑक्सिजन एकतेचा पूल' या विशेष मोहिमेनुसार भारतासाठी कतारमध्ये पाठवले होते. तेथून ते युद्धनौकांमार्फत भारतात आणले गेले. भारत व फ्रान्स यांच्यातील सहकार्याची ही मोहीम कतारमधील भारताचे राजदूत डॉ. दीपक मित्तल यांच्यामुळे निर्विघ्नपणे पार पडली. या मोहिमेत आणखी 600 मेट्रिक टन द्रवरूपी ऑक्सिजन येत्या दोन महिन्यांत समुद्रमार्गे भारतात आणला जाणार आहे. आज हे कंटेनर स्वीकारण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह फ्रान्सच्या भारतातील महावाणिज्य दूत सोनिया बार्बरी हजर होत्या.
त्रिखंड युद्धनौकेने दोहा व कतार येथून ऑक्सिजनचे कंटेनर, सिलेंडर व अन्य वैद्यकीय सामुग्री घेतली असून ती उद्या सकाळी मुंबईच्या नौदल गोदीत येणार हे निश्चित होतं. तेथून ते कंटेनर उतरवून गरज असलेल्या रुग्णालयांमध्ये पाठवले जातील. त्याखेरीज आयएनएस कोची आणि तबर या युद्धनौकादेखील सोमवारी किंवा मंगळवारी मुंबई किंवा मुंद्रा बंदरात दाखल होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन व अन्य वैद्यकीय सामुग्री आहे. अन्य युद्धनौकाही ऑक्सिजन आणि वैद्यकीय सामुग्री आणण्याच्या मोहिमेवर आहेत.
(संपादन- विराज भागवत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.