Insult of Rahul Deshpande in BJP Deepotsav programme Sachin Ahir mumbai Sakal
मुंबई

भाजपच्या 'दीपोत्सव' कार्यक्रमात राहुल देशपांडेंचा अपमान

सचिन अहिर : व्हिडीओ ट्विट करत याबाबत टीका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वरळीच्या जांबोरी मैदानात मुंबई भाजपद्वारे आयोजित ‘मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव’ कार्यक्रमात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा अपमान केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी केला. याबाबतचा एक व्हिडीओ ट्विट करत त्यांनी याबाबत टीका केली. भाजपच्या या कार्यक्रमात राहुल देशपांडे यांचे गायन सुरू होते. त्यावेळी मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा हे अभिनेते टायगर श्रॉफ यांना घेऊन मंचावर आले. त्यावर सूत्रसंचालक पुष्कर श्रोत्री यांनी ‘आता आपण एक पाच मिनिटांचा ब्रेक घेऊयात’, अशी घोषणा केली.

त्यामुळे राहुल देशपांडे काहीसे नाराज झाले. त्यांनी श्रोत्री यांना जवळ बोलावून ‘एक मिनिटांचा ब्रेक घेतला, तरी मी नंतर गाणार नाही, माझं गाणं होईपर्यंत मला ब्रेक नकोय’, असे स्पष्ट सांगत असल्याचा आवाज माईकवर ऐकू येत होता. आमदार मिहीर कोटेचा यांच्या लक्षात हा सर्व प्रकार आल्यानंतर त्यांनी आपल्या एका सहकाऱ्याला पुष्कर आणि राहुल यांच्याशी संवाद साधण्यासाठी पाठवले. यावेळी राहुल यांनी त्यांनाही स्पष्टपणे सांगितले, की ‘त्यांना म्हणा २० मिनिटे थांबा, २० मिनिटात मी गाणे संपवतो आणि मग काय करायचं ते करा. मला हे असं चालणार नाही, नाहीतर मी उठून जातो. राहुल देशपांडे यांच्या नाराजीनंतरही टायगर श्रॉफचा सत्कार करण्यात आला. यावेळीही ‘मी उठू का?’ असा प्रश्न विचारत असल्याचा राहुल यांचा आवाज ऐकू येत आहे. यावर सचिन अहिर यांनी भाजपवर कठोर टीका केली आहे. हाच का मराठी माणसांचा सन्मान, असा सवाल ट्विटर वर करत अहीर यांनी भाजपला सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT