माणगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मुंबई-पुण्यासह अनेक शहरातील खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मूभा दिली आहे. तसेच मुंबई-पुण्यात घरी राहून काम करण्यापेक्षा अनेक चाकरमान्यांनी गावाकडील घरी राहून काम करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्या, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि इंटरनेटद्वारे होणारी कामे असे सर्व कर्मचारी गावी गेले असून तिथूनच कार्यालयीन काम करण्यास प्राधान्य देत आहे.
मोठी बातमी ः दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत 'मे' महिन्याच्या अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या...
लॉकडाऊन असतानाही बँका, सरकारी कार्यालये व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने मुंबई, पुणे या शहरातून सुरक्षितततेचा उपाय म्हणून अनेक बँक, कंपनी कर्मचारी कुटुंबासह गावी परतले आहेत. त्यांचे गावी सार्वजनिक सभागृह, शाळा व रिकाम्या घरात विलगीकरण केले आहे; मात्र कार्यालयातील कामाची पूर्तता करता करता या कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत. त्यापैकी महत्वाची अडचण म्हणजे इंटरनेटचा अभाव.
गावात विविध कंपन्यांचे सिम कार्ड वापरूनही नेटवर्क मिळत नाहीत. मोठ्या प्रमाणात डाटा संपत आहे. केलेले काम अपलोड होत नाही. काही डाऊनलोड करायचे असेल तरीही खूप वेळ जात असून गावी आलेले कर्मचारी नेटवर्कमुळे अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी दिवसा काम होत नाही म्हणून रात्री जागून काम करण्याचा प्रयत्न केला; मात्र रात्रभर जागूनही इंटरनेट मिळत नसल्याने कर्मचारी तणावाखाली आहेत.
शहरात राहणे धोक्याचे व असुरक्षित आहे. तर गावी राहिल्यास नोकरी धोक्यात, अशा परिस्थितीत चाकरमानी सापडले आहेत. अनेक चाकरमानी नेट मिळत नसल्याने पुन्हा शहराकडे जात आहेत. मात्र कुटुंब गावी असल्याने त्यांच्या व पालकांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात सर्वत्र अनेक नामांकित कंपन्यांच्या मोबाईल सेवा आहेत. गावे नेटवर्कने जोडण्याचा गेले कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहे; मात्र कॉल ड्रॉप होणे, नेटवर्क नसणे यासारख्या अनेक समस्या नेहमीच उद्भवत आहेत.
मोठी बातमी ः कोरोना झाल्यास पोलिसांवर तातडीने उपचार होणार, महाराष्ट्र कुटूंब आरोग्य योजनेत कोव्हिडचा समावेश
कंपनीने ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा दिली आहे. मुंबईत धोका आहे. त्यामुळे कुटुंबाच्या आग्रहामुळे गावी आलो. विलगीकरणात राहून काम करीत असताना नेटवर्कमुळे खूप अडचणी येत आहेत. दिवसा इंटरनेट मिळत नसल्याने रात्री जागून कामे करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यालाही यश आले नाही. त्यामुळे पुन्हा शहरात गेल्याशिवाय पर्याय नाही.
- मिलिंद शेडगे, चाकरमानीकंपनी सुरू झाली आहे .सुरुवातीला गावी राहून काम करण्याचा प्रयत्न केला; मात्र नेटवर्क समस्येमुळे पुन्हा मुंबईत आलो.
- महेश घुलघुले, कर्मचारी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.