Ugro Capital Expands: भारतातील विशेषत: टियर टू ते टियर फोर शहरांमध्ये कार्यरत असलेल्या सूक्ष्म-उद्योग क्षेत्राची लक्षणीय क्षमता युग्रो कॅपिटल जाणून आहे. या वंचित बाजारपेठांना सेवा देण्याच्या उद्देशाने गतिमान धोरणासह, युग्रो कॅपिटलने केंद्रित आणि उद्देश आधारित दृष्टीकोन आखलेला आहे.
सध्या, कंपनीच्या कर्ज पोर्टफोलिओमध्ये अंदाजे 60 ते 70 टक्के हा मोठा भाग हा प्रामुख्याने देशभरातील छोट्या शहरी केंद्रांमध्ये वसलेले आणि 15 लाख ते 15 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या सूक्ष्म उद्योगांशी समर्पित आहे. कंपनीच्या विस्तार योजनेत यंदाच्या वर्षात 105 ठिकाणांहून 250 पर्यंत आणि त्यापुढील वर्षी 400 गावांपर्यंत उपस्थिती वाढविली जाणार आहे.
विशेषत: उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सारख्या नवीन राज्यांत तर आंध्र प्रदेश, महाराष्ट्र इत्यादीसारख्या सध्याच्या कार्यरत राज्यांमध्ये अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. या विस्ताराचे उद्दिष्ट युग्रोची संलग्नता वाढवणे आणि या गतिमान परंतु बहुंताश दुर्लक्षित अर्थव्यवस्थांना पाठबळ देणे, हे आहे.
कंपनीच्या वाढीचा मार्ग केवळ बाजाराच्या मागणीशीच नव्हे तर ग्रामीण भाग त्याचबरोबर टियर टू ते टियर फाईव्ह श्रेणीतील शहर विकासावर सरकारच्या नूतनीकरणाच्या प्रयत्नांशी देखील संलग्न आहे. एमएसएमईच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचत तळागाळातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कंपनी तिच्या सुधारित पायाभूत सुविधा आणि डिजिटल क्षमतांचा लाभ घेत आहे.
प्रश्नः नवीन सरकार ग्रामीण भारत, टियर टू, टियर थ्री शहरांवर कशा पध्दतीने लक्ष केंद्रित करेल, या संदर्भात सर्वांनी बरीच चर्चा ऐकलेली आहे. युग्रो कॅपिटलमध्ये तुमची योजना काय आहे? तुमचा सध्या या क्षेत्रासाठी किती वित्तपुरवठा (एक्सपोजर) आहे? या संधीचा फायदा घेण्यासाठी तुमची काय योजना आहे?
उत्तरः जेव्हा सूक्ष्म उद्योग विभागाचा विचार केला जातो तेव्हा ही शहरे आणि या शहरांमधील लहान व्यवसायांची वाढीची क्षमता आणि लवचिकता आणखी मजबूत होईल, असा यूग्रो कॅपिटलला विश्वास आहे. बाजारातील एकूण कर्ज पुरवठ्याच्या अंदाजे 60 ते 70 टक्के कर्ज या विभागांवर केंद्रीत झालेले आहे. आम्ही सूक्ष्मउद्योजक विभागात तळाशी किंवा मध्यभागी उभे आहोत. 90 लाख कोटींचे भांडवली मूल्य असेल्या या विभागातील 15 लाख ते 15 कोटी दरम्यान व्यापार उलाढाल करणाऱ्या ग्राहक वर्गांवर आम्ही लक्ष केंद्रीत केलेले आहे. हे उद्योजक अगदी लहान शहरे आणि मध्यम शहरांमधील आहेत.
युग्रो सध्या 105 ठिकाणी कार्यरत आहे. यंदाच्या वर्षात 250 आणि पुढील वर्षी 400 नवीन ठिकाणे आम्ही विस्तारात जोडणार आहेत. ही ठिकाणे टियर टू ते टियर फाईव्ह या शहरांमधील असणार आहेत. आम्ही दक्षिणेत अतिशय सक्षम असून या आमच्या बालेकिल्ल्याला उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र आणि महाराष्ट्र ही राज्ये तसेच उत्तरेतील तीन राज्ये जोडणार आहोत. शचिंद्र नाथ फाऊंडर आणि एम.डी., यूग्रो कॅपिटल यांच्याशी याबाबत संवाद साधला आहे.
प्रश्नः संयुक्त कर्ज वितरणाच्या भागीदारीसाठी मोठ्या बँकांशी संपर्क साधताना तसेच त्यांच्याशी करार करताना लहान एनबीएफसी कपन्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो?
उत्तरः संपूर्ण बँकिंग क्षेत्राकडून होणाऱ्या एकूण कर्जपुरवठ्यात निव्वळ बँकिंग कर्जपुरवठ्यातील सरासरी 40 टक्के कर्जपुरवठा हा प्राधान्य क्षेत्राला असावा, असा नियामकांचा किंवा धोरणात्मक योजनांचा हेतू आहे. परंतु आपल्या सर्वांना बँकिंग क्षेत्राबद्दल कल्पना आहेच. अलिकडच्या काळात बँकेकडून प्राधान्य क्षेत्राला कर्जपुरवठा सुधारला असला तरी विविध कारणांमुळे प्राधान्य क्षेत्राला सर्वाधिक कर्जवितरण हे वास्तविक मध्यम प्रमाणात आर्थिक उलाढाल असलेल्या आकाराच्या एनबीएफसीद्वारेच केले जाते.
त्यामुळे, मोठी उलाढाल असलेल्या एनबीएफसीद्वारे मोठ्या रकमेच्या कर्जावर किंवा बाजाराच्या भागावर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यात प्राधान्य क्षेत्र असूही शकतात किंवा नसूही शकतात. परंतु ज्या एनबीएफसी 1000 कोटी ते 10,000, 15,000 कोटी रुपयांच्या मालमत्ता श्रेणीतील आहेत, त्या खरोखरच प्राधान्य क्षेत्राला कर्जपुरवठा करत आहेत.
मग ते कृषीला असू शकते, एमएसएमई क्षेत्राला असू शकते, ते हाऊसिंग फायनान्स कंपन्या, मायक्रो फायनान्स कंपन्यांना अशा कितीतरी घटकांना हा कर्जपुरवठा असू शकतो. परंतु भारतात आज अशा एनबीएफसींना सुरळीत पध्दतीने निधीचा पुरवठा होताना दिसत नाही. एकतर बँकांकडून एनबीएफसीला असलेला वित्तपुरवठा हा मोठी उलाढाल असलेल्या एनबीएफसींनाच होतो. तो मध्यम उलाढाल असलेल्या एनबीएफसी कंपन्यांना अजिबात होताना दिसत नाही.
भागीदारी तत्वावर कर्जपुरवठा केल्यास प्रश्न सुटतील, असे गृहीत धरण्यात आले होते, परंतु एक लाख कोटी रुपयांचा भागीदारी तत्वावर भारतात वितरित झालेला कर्जपुरवठा बारकाईने तपासल्यास क्रिसीलच्या अहवालानुसार त्यातील 60 टक्के निधी हा बिगर प्राधान्य क्षेत्राला वितरित झालेला दिसतो.
त्यामुळे नियामक तसेच सरकार असा दोन्ही पातळीवर एनबीएफसीला सातत्यपुर्ण वित्तपुरवठा होण्यासाठी काय करता येईल, याबाबत नव्याने प्रयत्न केले जात आहे. अन्यथा या एनबीएफसी कंपन्या बँकाकडील मुदत कर्जावर किवा भांडवली बाजारावर वित्तसहाय्यासाठी मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.
युग्रोसारखी कंपनी खूप चांगल्या प्रकारे वैविध्यता राखून आहे. आमच्याकडे जागतिक पातळीवरील डीएफआय गुंतवणूकदार आहेत. आम्ही भागीदारी तत्वावर कर्जपुरवठा करण्यात बाजारात अग्रस्थानी असलो तरी प्रत्येक वित्तपुरवठादारासाठी विशेषतः आमच्यापेक्षा कमी उलाढाल असलेल्यांबाबत अशी स्थिती असू शकत नाही.
म्हणूनच बँका आणि खूपच कमी उलाढाल असलेल्या एनबीएफसीमध्ये भागीदारी तत्वावर होणाऱ्या कर्जपुरवठ्यातील अडचणी, संघर्ष कसा टाळता येईल, यासाठी खास प्रयत्न केले जात आहे. बँकींग व्यवस्थेत असलेली रोखता (लिक्विडिटी) एनबीएफसीच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी काय पावले उचलता येतील, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच असोचेम, एफआयडीसी, विविध उद्योग संस्था हे घटक वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन उपाय शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत.
तसेच एनबीएफसीद्वारे उत्तरदायित्वाच्या बाजूने कर्ज वितरणाला प्रत्यक्षात अधिक मदत केली जात आहे. त्याच्याकडून केल्या जात असलेल्या या चांगल्या कामाची सरकारी पातळीवर दखल घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मला असे वाटते की, मोठ्या प्रमाणात ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असलेल्या, वैयक्तिक कर्ज देत असलेल्या आणि जे वास्तविक आर्थिक उत्पादन वाढीसाठी अजिबात उपयुक्त नाही, अशा एनबीएफसींना शेवटच्या घटकांपर्यंत कर्जपुरवठ्याचे उत्तम काम करत असलेल्या एनबीएफसींपासून वेगळे काढण्याची नितांत गरज आहे.
प्रश्नः या टियर टू, टियर थ्री, टियर फोर स्थानांचा पुन्हा विचार करताना, तुम्ही तिथेही तुमचे अस्तित्व विस्तारत आहात. ते तुमच्या व्यवसायाला कसे चालना देईल? आम्ही तुमची त्रैमासिक आर्थिक आकडेवारी आणि पूर्ण वर्षाची आकडेवारी देखील पाहिली आहे. जर तुम्हाला या नवीन ठिकाणांचा चांगला लाभ घेता आला आणि खरोखरच सरकारी भांडवल आणि लक्षही तिकडेच केंद्रीत झालेले असेल, तर पुढील दोन-तीन वर्षांत तुमच्या एकूण व्यवसायाला किती चालना मिळेल ?
उत्तरः बाजारात सध्या तीन मोठे प्रवाह असल्याचा आमचा विश्वास आहे आणि मला असे वाटते की, सध्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर बाजाराने ही वस्तुस्थिती नीट समजून घेतलेली नसावी. प्रत्यक्षात सरकार देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विस्तारावर, टियर टू ते टियर फाईव्ह शहरांच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करताना दिसणार आहे.
आणि आमच्यासारख्या व्यवसायांनी नुकतेच स्वतःला लक्षणीयरित्या भांडवलीकृत केलेले आहे. आम्ही जवळजवळ 1300 कोटी रुपयांपेक्षा अधिक भांडवल उभे केले आहे. या पैशातील मोठा भाग आधीच आलेला आहे. आम्ही जीएसटी पायाभूत सुविधा, डिजीटल बँकिंग पायाभूत सुविधा वापरत आहोत आणि आमचा स्वःतच्या मालकीचे डेटा विश्लेषण साधन विकसित करत असून त्याला पूरक भौतिक भूगोलाच्या माहितीची जोड देत आहोत.
अर्थव्यवस्थेतील तळपातळीचा भाग वाढतच राहणार आहे. किमान आमच्यासाठी एमएसएमई वित्तपुरवठ्याभोवती गुंफली गेलेली मोठी संस्था आकारास येण्याची शक्यता अगदी स्पष्ट दिसत आहे. आम्ही खूप उत्साही आणि आशावादी आहोत. आम्ही दरवर्षी जवळपास 3000 कोटी रुपयांनी विस्तारत आहोत. आगामी 8 ते 10 तिमाहींमध्ये 20,000 कोटी रुपयांची उलाढाल असलेले एक मोठी वित्तसंस्था बनवण्याचा पहिला टप्पा आम्ही सुरू केलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.