IPS officer Saurabh Tripathi controversial Angadia extortion case posted to intelligence wing of state police Sakal
मुंबई

IPS Saurabh Tripathi : अंगडीया खंडणी प्रकरणात विवादास्पद ठरलेले, IPS सौरभ त्रिपाठींची राज्य पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागात वर्णी

सौरभ त्रिपाठी यांची आता राज्य गुप्तचर विभागात पोलीस उपयुक्त म्हणून वर्णी लागली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अंगडिया खंडणी प्रकरणी गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये निलंबित करण्यात आलेले आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना हल्लीच राज्य सरकारने सेवेत पुनर्स्थापित केलें. यानंतर सौरभ त्रिपाठी यांची आता राज्य गुप्तचर विभागात पोलीस उपयुक्त म्हणून वर्णी लागली आहे. राज्य सरकारने सोमवारी त्रिपाठींच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहे.

त्रिपाठी यांची पोलिस उपायुक्त म्हणून काम करताना देशविरोधी घटकांशी संबंधित गुप्तचर माहिती गोळा करणे तसेच सरकारला धोरणात्मक निर्णय घेताना सल्ला देणे अशी जबाबदारी असणार आहे.

पुनर्वसनामागचे कारण

सौरभ त्रिपाठी याना सेवेत पुनर्स्थापित करताना मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची स्थापन करण्यात आली होती. या समितीनं त्रिपाठी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली.

आयपीएस अधिकाऱ्याला तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी निलंबित ठेवता येत नाही, त्यामुळं त्रिपाठींचं निलंबन मागे घेण्यात येत आहे, असं या समितीनं निर्णय घेताना म्हटलं आहे.

प्रकरण काय?

आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी यांच्यावर गेल्यावर्षी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यासाठी राज्याच्या गृहविभागान तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. 22 मार्च 2022 रोजी त्रिपाठी यांचे निलंबन करण्यात आले होते.

त्रिपाठी यांच्या वर गुन्हा दाखल झाल्यावर ते बेपत्ता झाले होते. त्यामुळे गुन्हे शाखेन त्यांना फरार म्हणून घोषित केले होते. याकाळात त्रिपाठी यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी स्थानिक कोर्टात धाव घेतली होती. या याचिके मध्ये त्यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT