tejas-express- sakal media
मुंबई

IRCTC : महिला प्रवाशांना रक्षाबंधन विशेष 'कॅश बॅक ऑफर', जाणून घ्या सविस्तर

कुलदीप घायवट

मुंबई : बहीण आणि भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन सण (rakshabandhan festival) साजरा केला जातो. या सणाच्यानिमित्ताने इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (IRCTC) महिला प्रवाशांना 5 टक्के विशेष कॅशबॅक ऑफर (5% cash back offer) ठेवली आहे. आयआरसीटीसीच्या मुंबई-अहमदाबाद, लखनऊ-दिल्ली या दोन तेजस एक्सप्रेसमधून (tejas express) 24 ऑगस्टपर्यंत प्रवास करणाऱ्या सर्व महिला प्रवाशांना 5% विशेष कॅशबॅक ऑफर दिली आहे.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) च्यावतीने गाडी क्रमांक 82501/02 लखनऊ - दिल्ली - लखनऊ आणि गाडी क्रमांक 82901/02 अहमदाबाद - मुंबई - अहमदाबाद चालविण्यात येत आहेत. सध्या या दोन तेजस एक्सप्रेस शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार अशा चार दिवसांच्या साप्ताहिक वारंवारतेसह चालविल्या जातात. तर, आता रक्षाबंधनाच्यानिमित्ताने 24 ऑगस्टपर्यंत महिला प्रवाशांना 5% विशेष कॅशबॅक ऑफर देत आहेत.

कॅशबॅक ऑफर 15 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान केलेल्या प्रवासासाठी लागू आहे. प्रवाशांनी कितीही वेळा प्रवास केला तरी त्यांना कॅशबॅक ऑफरचा लाभ घेता येईल. यासह ज्याद्वारे तिकीट बुक केली आहेत, त्याच खात्यात 5 टक्के रक्कम जमा केली जाईल. ऑफर सुरू होण्यापूर्वी प्रवासाच्या कालावधीसाठी ज्या महिला प्रवाशांनी आधीच तिकिटे बुक केली आहेत, त्यांच्यासाठीही कॅशबॅक लागू होईल, असे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले.आगामी सणासुदीसह, आयआरसीटीसीच्या प्रीमियम पॅसेंजर गाड्यांच्या प्रवाशांसाठी अधिक आकर्षक प्रवास ऑफरची योजना आखत आहे. ही योजना यापुढे सुरू केली जाईल, असे आयआरसीटीसीच्यावतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT