Israeli–Palestinian Conflict export of Gems and Jewellery hit mumbai business marathi news esakal
मुंबई

Israeli–Palestinian Conflict : इस्राईल युद्धामुळे दागिन्यांच्या निर्यातीलाही फटका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतातून इस्राईलला मोठ्या प्रमाणात रत्ने आणि दागिन्यांची निर्यात केली जाते. इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे या निर्यातीला फटका बसण्याची शक्यता आहे, अशी भीती देशातील रत्ने आणि दागिने निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.

भारत आणि इस्राईलमधील एकूण रत्ने आणि दागिन्यांचा आयात-निर्यात व्यापार २०२२-२३ दरम्यान २०४ कोटी डॉलर इतका होता. २०२१-२२ मध्ये हा व्यापार २७९ कोटी डॉलरचा होता. त्यात या वर्षात जवळपास २७ टक्के घट झाली आहे.

रत्ने आणि दागिन्यांच्या आयातीत वार्षिक ४२.३ टक्के, तर निर्यातीत १३.८ घट नोंदवली गेली आहे. २०२२-२३ मध्ये, आयात आणि निर्यात अनुक्रमे ७६ कोटी डॉलर आणि १२७ कोटी डॉलरची होती. सर्वाधिक निर्यात पॉलिश्ड हिऱ्यांची झाली असून, त्याचे मूल्य १२० कोटी डॉलर होते. कृत्रिम हिऱ्यांची निर्यात २०२२-२३ मध्ये २४.३५ टक्के वाढ होऊन ती ४०.६५ दशलक्ष डॉलरची झाली आहे.

युद्ध परिस्थितीमुळे इस्राईल आणि आशियातील दुसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार भारत यांच्यातील व्यापाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्याच्या सणासुदीच्या हंगामात रत्ने आणि दागिन्यांची विक्री वाढत आहे, अशा परिस्थितीत निर्यातीचे प्रमाण कमी झाल्यामुळे व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. युद्ध सुरू असलेल्या देशांमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित होईल आणि परिस्थिती सामान्य होईल अशी आशा आहे.

- कोलिन शहा, संस्थापक, कामा ज्वेलरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ, तुतारी हाती घेण्याचं बड्या नेत्यानं केलं निश्चित, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु

Badlapur School Crime: कोर्टानं कालच अटकपूर्व जामीन फेटाळला अन् आज शाळेच्या दोन्ही फरार विश्वस्तांना झाली अटक

Mohammad Shami: हात जोडून विनंती करतो...! मोहम्मद शमी संतापला, 'त्या' वृत्ताचा केला इन्कार

Pune Crime: पुण्यात भयंकर प्रकार! बिल्डरची सोसायटीतल्या रहिवाशांना मारहाण, अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

Pune Crime : सोमवार पेठेतील शाळेतून दोन मुली बेपत्ता; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT