मुंबई

'मुंबईतील कोरोनासंदर्भात तातडीने श्वेतपत्रिका काढा'; मुंबई भाजपची आयुक्तांकडे मागणी

कृष्ण जोशी

मुंबई : मुंबईतील कोरोना परिस्थितीबाबत तातडीने श्वेतपत्रिका काढावी तसेच, कोरोनाविषयक भ्रष्टाचाराची लोकप्रतिनिधींच्या समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुंबई भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

मुंबई भापजचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. यावेळी मुंबईतील छोट्या व मोठ्या कोरोना केंद्रांवरील भ्रष्टाचार, उभारणीतील गैरप्रकार, केंद्र चालविण्याचे कंत्राट दिलेल्या संस्थांनी केलेले गैरप्रकार, तेथे होणारी रुग्णांची गैरसोय, आदी बाबींबाबत शिष्टमंडळाने आयुक्तांशी चर्चा केली. या कोरोना केंद्रांवरील प्रशासकीय गोंधळ तसेच रुग्णांना मिळणाऱ्या भोजनाच्या दर्जाविषयींच्या तक्रारी देखील या शिष्टमंडळाने आयुक्तांसामोर मांडल्या. या तक्रारींवर अधिक माहिती घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त चहल यांनी दिले. 

खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांना फारशी सेवा न देता त्यांच्याकडून लाखोंची बिले वसूल करतात, अशी तक्रारही लोढा यांनी केली. खुद्द लोढा व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कुर्ला येथील एका रुग्णालयातील अशा तक्रारीची दखल घेण्यासाठी तेथे जाताच रुग्णालयाने 19 लाखाचे बिल 13 लाखांवर आणल्याचा अनुभवही लोढा यांनी सांगितला. त्याबाबतही कारवाईचे आश्वासन आयुक्तांनी दिले. यावेळी खासदार मनोज कोटक, भाजपा प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि भाजपा मनपा गटनेते प्रभाकर शिंदे उपस्थित होते.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाचा मोठा निर्णय! नोएल टाटांनी खरेदी केली नवी कंपनी; किती कोटींना झाला करार?

AUS vs PAK 2nd ODI : १९ वर्षानंतर पाकिस्तान जिंकला! विराटकडून धुलाई झालेला गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकला

Amit Shah : समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करुन छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला : अमित शहा

German Bakery Bombing Case : जर्मन बेकरी बाँबस्फोटातील हिमायत बेग पुन्हा कारागृहात

'स्वतःच्या स्वार्थासाठी कारखाना बंद पाडण्याचं पाप मुश्रीफांनी केलंय'; जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरींचा घणाघात

SCROLL FOR NEXT