admission 
मुंबई

विद्यार्थ्यांनो! आयटीआय प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

तेजस वाघमारे

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक आयटीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

राज्यातील खासगी आणि सरकारी आयटीआयमध्ये जागांसाठी प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू झाली. अर्ज भरण्याची मुदत 14 ऑगस्टपर्यंत होती. या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली असून सुधारित वेळापत्रक आयटीआयने जाहीर केले आहे. या प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना 26 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत हरकती नोंदविता येणार आहे. प्रवेशाची पहिली फेरी 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर होईल. या यादीतील विद्यार्थ्यांना 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुसरी प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत संस्थानिहाय प्राधान्यक्रम सादर करावे लागतील. या फेरीची यादी 9 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता जाहीर होईल. 

तिसऱ्या फेरीसाठी 10 ते 15 सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम सादर करावे लागतील. 18 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता निवडयादी संकेतस्थळावर जाहीर होईल. विद्यार्थ्यांना 19 ते 23 सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे. चौथ्या फेरीसाठी 19 ते 24 सप्टेंबरदरम्यान प्राधान्य भरता येतील. या प्रवेशाची यादी 28 सप्टेंबरला जाहीर होईल. विद्यार्थ्यांना 29 ते 3 ऑक्‍टोबर या कालावधीत प्रवेश निश्‍चित करावा लागेल. प्रवेश प्रक्रिया समाप्तीनंतर रिक्त राहणाऱ्या जागा भरण्यासाठी 5 ऑक्‍टोबरपासून जिल्हास्तरावर समुपदेशन फेरी राबविण्यात येईल. 

(संपादन : वैभव गाटे)

ITI admission process can be extended date

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT