मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने (kangana ranaut) गीतकार जावेद अख्तर (javed akhtar) यांनी केलेला खटला मुंबईच्या अंधेरी दंडाधिकारी न्यायालयातून (Andheri court) अन्यत्र वर्ग करण्याची याचिका पुन्हा दिंडोशी सत्र न्यायालयाने (Dindoshi session court) अमान्य केली आहे. यामुळे अख्तर यांनी दाखल केलेला मानहानीचा खटला (Defamation case) अंधेरी न्यायालयातच सुरू राहिल. (Javed akhtar defamation case will be in Andheri court only petition rejected by dindoshi session court)
कंगनाने वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांच्यावर वादग्रस्त आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये तथ्य नसून या मुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली आहे, असा मानहानीचा दावा अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात अख्तर यांनी केला आहे. याची दखल घेऊन न्यायालयाने तीला हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र या दाव्याची कारवाई नियमानुसार आणि बेकायदेशीरपणे होत आहे असा आरोप करुन ही सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात यापूर्वी अर्जाद्वारे केली होती. मात्र हा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. त्यामुळे आता तिने सत्र न्यायालयात अर्ज केला होता. शुक्रवारी न्यायालयाने तिची मागणी नामंजूर केली.
अंधेरी न्यायालयात किमान सहाहून अधिक वेळा कंगना सुनावणीला जाणीवपूर्वक गैरहजर राहिली होती. एकदा तिची मागणी अमान्य झाल्यावर याच मुद्यावर नव्याने याचिका करण्याची आवश्यकता नव्हती असा युक्तिवाद अख्तर यांच्या वतीने वकील जय भारद्वाज यांनी न्यायालयात केला. अतिरिक्त सत्र न्या एस यू बघेले यांनी कंगनाची याचिका नामंजूर केली. यासंबंधी सविस्तर निकालपत्र लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
अख्तर यांनी बदनामीचा दावा केल्यानंतर कंगनाने देखील अख्तर यांच्या विरोधात दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. अभिनेता ऋतिक रोशन याच्यासंबंधी अख्तर यांनी सूचना केल्या होत्या, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.