मुंबई : गिरणी कामगारांच्या (Mill workers) जगण्याची झालेली वाताहत सिद्धहस्त लेखणीद्वारे नाट्यकलाकृतीत (Dramatist) गुंफणारे ‘अधांतर’कार, प्रसिद्ध कथाकार (Play writer), नाटककार आणि समीक्षक जयंत पवार (Jayant Pawar death) (वय ६१) यांचे आज (ता. २८) निधन झाले. रात्री दोनच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. निधनाचे वृत्त कळताच सामाजिक, सांस्कृतिक आणि कला प्रांतात तीव्र दुःख व्यक्त (Condolence) करण्यात आले. त्यांच्या पश्चाच पत्नी लेखिका संध्या नरे-पवार आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बोरिवली-पूर्व येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपानंतर त्यांच्या कुटुंबीयांची झालेली वाताहत यावर बेतलेले ‘अधांतर’ हे नाटक जयंत पवार यांनी लिहिले. ते कमालीचे लोकप्रिय ठरले. या कलाकृतीने त्यांना नव्या जाणिवांचा नाटककार म्हणून ओळख दिली. महेश मांजरेकर यांनी याच नाटकावर ‘लालबाग-परळ’ हा चित्रपट बनविला होता. त्याचे संवादलेखन जयंत पवार यांनीच केले होते. या चित्रपटालादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘अधांतर’बरोबरच ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन’ अशा गाजलेल्या नाटकांसह त्यांच्या एकांकिका, कथा, दीर्घांकांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. सन २०१४च्या जानेवारी महिन्यात महाड येथे झालेल्या पंधराव्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी २०१२ चा साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. एक संवेदनशील नाटककार, कथाकार, नाट्यसमीक्षक म्हणून त्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपला वेगळा ठसा उमटविला होता. यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि कला चळवळ समृद्ध करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.