Chief Minister Eknath Shinde Shiv Sena intra-party differences in beed political news  
मुंबई

Kalawa Hospital Tragedy: 18 पेशन्टच्या मृत्यू प्रकरणाचा 10 दिवसांत अहवाल येणार, मग कारवाई; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

हॉस्पिटलवर मोठा ताण असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

ठाण्यातील कळवा इथल्या महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काल १८ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं राज्यभरात खळबळ उडाली होती. या रुग्णालयाचा संपूर्ण आढावा आज मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास रुग्णालयातूनच पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली.

या मृत्यू प्रकरणांचा सखोल चौकशी अहवाल २५ ऑगस्टपर्यंत मागवण्यात आला असून त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. (Kalawa Hospital Tragedy Patient death case to be reported in 10 days then action says CM Eknath Shinde)

रुग्णालयाला भेट दिल्यानंतर इथल्या अॅडमिट पेशन्टची स्थिती पाहिली तसेच उपचारांबाबत त्यांच्या नातेवाईकांशी देखील संवाद साधला. उपचारांच्या बाबतीत सर्वांनी समाधान व्यक्त केलं आहे. या रुग्णालयात केवळ ठाणेचं नव्हे जिल्ह्याच्या बाहेरील पेशन्टही दाखल झाले आहेत.

काल दुर्घटना घडल्यानंतर जवळपास ९१ पेशन्ट इथं अॅडमिट झाले आहेत यांपैकी २२ जणांवर शस्त्रक्रिया देखील झाली. काल दिवसभरात १८ पेशन्टच्या मृत्यूंची चौकशी तर होईल, पण या रुग्णालयावरचा भार पाहिल्यानतंर इथं दिवसरात्र काम करणारे डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफचं खच्चिकरण होता कामा नये याची काळजी घेतली जाईल. कारण उपचारानंतर रुग्ण बरा होऊन घरी जावा अशी प्रत्येक डॉक्टरची अपेक्षा असते. अतिशय क्रिटिकल पेशन्टवर इथं महागडी इंजेक्शन्स देऊन उपचार झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. (Latest Marathi News)

दहा दिवसांत चौकशी अहवाल येणार

दरम्यान, काल या रुग्णालयात १८ लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला याबाबत आपण कालच चौकशी समिती नेमली आहे. आरोग्य आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, उपसंचालक, सिव्हील सर्जन अशा नऊ लोकांचा या समितीत समावेश आहे. २५ तारखेपर्यंत या दुर्घटनेचा सखोल चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना या समितीला देण्यात आल्या आहेत. हा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई होईल. (Marathi Tajya Batmya)

मृत पेशन्ट गंभीर आजारांमुळं झाले होते अॅडमिट

"ज्या रुग्णांचे मृत्यू झाले त्याची कारणं मी पाहिली त्यात क्रोनिक हार्ट डिसिज, पॅरालिसिस स्ट्रोक, लंग डिसिज, अल्सर कॉम्प्लिकेशन्स, न्युमोनिया, रोड अॅक्सिडेंट, केरोसिन पॉईजनिंग अशा विविध कारणांमुळं ते पेशन्ट अॅडमिट झाले होते. पण या दुर्घटनेच्या मुळाशी जाण्याची गरजेचं आहे" असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT