ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार आवारही बंद होते. महापालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट वगळता इतर भागातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने मंगळवारपासून (ता. 21) निर्बंधानुसार बाजार समिती सुरु करण्याचा निर्णय सोमवारी(ता. 20) घेण्यात आला.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 19 जुलैपर्यंत पूर्ण लॉकडाऊन घेण्यात आला होता. यामुळे बाजार समितीचे बाजार आवारही बंद ठेवण्यात आले होते. सोमवारपासून महापालिकेने हॉटस्पॉट वगळता इतर भागातील लॉकडाऊन शिथील केली असल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार आवारही खुला करावा याविषयी सोमवारी आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. बाजार समितीतील मुख्य अन्नधान्य बाजार विभाग 16 जुलैपासूनच सुरु करण्यात आला होता. परंतु बाजार विभाग लॉकडाऊनमुळे सुरु करण्यात आला नव्हता.
आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने हा विभागही मंगळवार पासून सुरु होत आहे. बाजार आवार सुरु करतानाच बाजार आवारात गर्दी होऊ नये यासाठी भाजीपाला, फळे व कांदा बटाटा बाजार विभागातील इमारत व गाळा व्यापाऱ्यांना दिवस ठरवून देण्यात आला असून केवळ घाऊक व्यापारास परवानगी देण्यात आली आहे. अन्नधान्य व्यावसायिकांनी ऑनलाईनच व्यवसाय करावा असे सांगण्यात आले आहे. अटी शर्थींसह कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजार आवार मंगळवार पासून खुला करण्यात येईल. अटी-शर्थींचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व इतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी निर्देश काढले आहेत.
असे असतील नियम
---
संपादन : ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.