डोंबिवली - कल्याण डोंबिवलीतील (kalyan-dombivali) रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळून निधी देण्याची तयारी एमएमआरडीएने (mmrda) दाखवली आहे. शिवसेनेच्या (shivsena) प्रयत्नाने ही कामे मंजूर झाली असून सेनेचे बॅनर सध्या शहरात झळकत आहेत. निधी मिळताच सेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (shrikant shinde) यांनी भाजपा आमदारांवर (bjp mla) निशाणा साधत विरोधक वैफल्यग्रस्त असल्याचे बोलले होते. त्यानंतर आता मनसे आमदार राजू पाटील (raju patil) यांनी कामांचे केवळ बॅनर लागतात, प्रत्यक्षात कामे कुठे असे विधान करीत खासदारांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांच्या निधीवरून राजकीय टोलवाटोलवी सूरु झाल्याचे पहायला मिळत आहे. (kalyan-dombivali-mmrda-shivsena-shrikant shinde-bjp mla-raju patil-nss91)
कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांच्या कामासाठी 360 कोटी रुपयांचा निधी, एमआयडिसीतील रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटी निधी एमएमआरडिने मंजुर केला आहे. शिवसेनेच्या कार्यकाळात हा निधी मंजूर झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे खासदार डॉ. शिंदेंचे बॅनर सध्या शहरात झळकत आहेत. रस्त्यांच्या कामासाठी 360 कोटींचा निधी मंजूर होताच खासदार शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. केवळ कागदी घोडे नाचवून निधी मंजूर झाल्याचे चित्र निर्माण करायचे यात तत्कालीन सत्ताधारी आणि सध्या विरोधी पक्षाचे असलेले आमदार रमले असल्याचे ते बोलले होते.
यावर आमदार चव्हाण यांनी अजून तरी चुप्पी साधली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी मात्र यावरून खासदार शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. एमएमआरडीएने मंजूर केलेले रस्ते कोणत्या सालातील आहेत? नुसत्या मंजुऱ्या येतात, होर्डिंग लागतात, मात्र प्रत्यक्षात कामे कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित करत आम्ही मंजूर केलेले रस्तेही आपल्या नावावर खपवतात असा टोला त्यांनी लगावला. एमआयडिसीतील 110 कोटीही मंजूर झाले कामे सुरू झाली का? मानपाडा रस्त्याचे काम अशोक चव्हाण यांच्याकडून मंजूर करून आणले, त्याचे स्पष्ट पत्रही माझ्याकडे आहे. मात्र श्रेयाच्या लढाईत मला पडायचे नाही ते त्यांनीच करावे असेही ते म्हणाले. रस्त्यांच्या कामासाठी एमएमआरडीएने निधी मंजूर केला आहे. अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही. मात्र या कामाच्या श्रेयवादावरून राजकीय टोलवाटोलवी सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.