कल्याण : दिवसेंदिवस इंधन दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचे खिसे खाली होत असताना आता इंधन दरवाढीने केडीएमटीचे टायर पंक्चर झाल्याचं पाहायला मिळतंय. इंधन खर्च आणि उपन्न याचा ताळमेळ घालणं म्हणजे केडीएमटी प्रशासनासाठी डोके दुःखी झालीये. यात नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने आता केडीएमटी बंद करा अशी मागणी नागरिक आणि प्रवासी संघटनेकडून होत आहे.
कल्याण डोंबिवली मनपा परिवहन उपक्रमाच्या ताब्यात दोनशेपेक्षा अधिक बसेस आहेत. मात्र नादुरुस्त बसेस संख्या वाढत असल्याने जवळपास प्रतिदिन सरासरी 60 बसेस रस्त्यावर धावतात. मात्र त्याही बसेस शेवटच्या स्टॉप पर्यंत जातील की नाही याचा भरोसा नसल्याने प्रवासी केडीएमटी बस कडून दूर जातायत. अशात इंधन दरवाढीने केडीएमटी प्रशासनाला घाम फुटला असुन त्यात उपन्न नसल्याने इंधन खरेदीसाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न पडला आहे.
सध्या पालिकेच्या ताफ्यात अनेक वाहन असल्याने त्या खर्चामधून केडीएमटीचा इंधन खर्च भागवला जातोय. मात्र असं किती दिवस चालणार, एकीकडे बस मधून प्रवासी मिळत नाही, तर केडीएमटी बंद करा नाहीतर बस मधून मोफत प्रवास करण्यास मुभा द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश तेलवणे यांनी केली आहे.
केडीएमटी उपन्न आणि इंधन खर्च
महत्वाची बातमी : शहाळ्याच्या ट्रकची झडती घेताच पोलिसच झाले अवाक; समोर होतं एक टन 800 किलो गांजाचं घबाड
इंधन दरवाढीने निश्चित फटका बसला आहे, यावर तोडगा काढण्यासाठी बसेसमध्ये CNG सिस्टम बसविण्यासाठी प्रयन्त सुरू असल्याची माहिती केडीएमटी व्यवस्थापक मिलिंद धाट यांनी दिली
kalyan dombivali news income and revenue dose not match KDMT on the verge of shut down
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.