mumbai sakal
मुंबई

कल्याण डोंबिवलीतील दुर्मिळ वृक्षांची नोंद होणार

ग्रीन रेस उपक्रमांतर्गत कल्याण डोंबिवलीकर करणार नोंदणी

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - श्रावण (Shravan) म्हणजे निसर्गाचे दान. याच श्रावणात निसर्ग आपल्या हिरव्या श्रीमंतीने (Rich) निसर्गप्रेमींना (Nature lover) आकृष्ट करत असतो. आपल्या आजू बाजूलाही झाडांना (Tree) बहर आला असेल, काही नव्या झाडांची पालवी फुटली असेल अशा झाडांबद्दल गोडी वाढविण्यासाठी कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) महानगरपालिका आणि न्यास ट्रस्टच्या वतीने ग्रीन रेस या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन (Organizing) करण्यात आले आहे. दुसऱ्यांदा हा उपक्रम महापालिका (Municipal Corporation) क्षेत्रात राबविण्यात येत असून पहिल्या उपक्रमात 125 विभिन्न वृक्षांची (Of trees) नोंद झाली होती.

वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धन होणेही आवश्यक आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात भोपर, निळजे, भोपर, कोपर, खोणी, रेती बंदर, खाडी आणि इतरही कित्येक ठिकाणी चांगले अधिवास लाभलेले आहेत आणि या अधिवासात वनस्पती, पक्षी यांचे चांगले वैविध्य आहे. आपल्याला ही जैव विविधता जतन करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला काय जतन करायचे ते माहित हवे आणि त्यासाठी या निसर्ग संपदेबाबत जागृती निर्माण व्हायला हवी यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि न्यास ट्रस्ट यांच्या वतीने ग्रीन रेस उपक्रम राबविण्यात येत आहे.

कल्याण येथील नावाजलेल्या वनस्पती तज्ञ डॉ. श्रध्दा शिंपी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 26 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार असून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व शहर अभियंता सपना कोळी यांच्या सहकार्याने 9 वर्षानंतर पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ही झाडांची नोंदणी केली जाणार आहे. यापूर्वी 2013 ला हा उपक्रम महापालिका आणि न्यास ट्रस्टने राबविला होता. त्यावेळी वरून, वारस यांसारख्या दुर्मिळ वृक्षांची नोंद डोंबिवलीत झाली होती. वृक्षांच्या 125 नव्या प्रजाती त्यावेळी आढळून आल्या होत्या. यंदाही अशा अनेक वेगवेगळ्या प्रजातीच्या झाडांची नोंद होईल असा विश्वास न्यास ट्रस्टने व्यक्त केला. यात सहभागी होणाऱ्या नागरिकांना 26 ऑगस्टला झाडांची नोंदणी कशी करायची याविषयी मार्गदर्शन केले जाईल. त्यांना एक अँप किंवा पीडीएफ फाईल फॉर्म्याट दिले जाईल. त्यात त्यांनी नोंदणी करायची आहे असे विश्वास भावे यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली ग्रीन रेस हा महापालिका क्षेत्रातील वृक्षसंपदेची ओळख आणि नोंदणी करण्यासाठी आणि वृक्षांबद्दल गोडी वाढवण्यासाठी आयोजित केलेला स्पर्धात्मक उपक्रम आहे. माणूस आणि वनस्पती यांना जवळ आणण्यासाठी हा नक्कीच उपयोगी ठरेल. सर्व वनस्पतीप्रेमी आणि निसर्गप्रेमींनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करत आहोत. विश्वास भावे, न्यास ट्रस्ट

  • कोण सहभागी होऊ शकतं...

विद्यार्थी, शिक्षक, गृहिणी, वृद्ध, नोकरदार वर्ग, व्यावसायिक तज्ञ असे कोणीही या ग्रीन रेसमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यासाठी शिक्षण, पदवी, वय, व्यवसाय, आणि ज्ञान अशा कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. हौशी लोक आणि तज्ञ अशा दोन वर्गात नोंदणी करणात येईल. या उपक्रमात सहभाग घेण्याचा एकमेव निकष म्हणजे वनस्पतींबद्दल आवड असणे.

  • सहभाग कसा घ्यायचा?

हा सहभाग 3 ते 5 जणांच्या गटाने घ्यायचा आहे. आपले गट तयार करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला असेल. नोंदणीसाठी फॉर्म्स नियमावलीसकट केडीएमसी पोर्टलवर असेल आणि तो सर्व सोशल मिडियावर उपलब्ध केला जाईल. नोंदणी साठी कोणत्याही प्रकारची शुल्क नाही. नोंदणीची अंतिम तारीख 26 ऑगस्ट आहे.

सर्व सहभागींनी २७ ओगस्ट ते २ सप्टेंबर या काळात आपण निवडलेल्या क्षेत्रात फिरून आढळलेल्या वनस्पतींची नोंद लॉगबुकमध्ये करायची आहे आणि ते लॉगबुक 2 सप्टेंबर रोजी सांगितलेल्या ठिकाणी सदर करायचे आहे. परीक्षकांची एक टीम या सर्व लॉगबुक्सचे परीक्षण करेल आणि विनर्सची नावे जाहीर करेल. हौशी आणि तज्ञ या दोन वर्गासाठी निवडलेल्या गेलेल्या गटांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT