Lok Sabha Election 
मुंबई

Lok Sabha Election : कल्याण लोकसभेवर खासदार कोणाचा? विजयादशमीला मंत्री रविंद्र चव्हाण यांचं सूचक विधान

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात एनडीएचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजप डावपेच

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात एनडीएचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजप डावपेच आखत आहे. एनडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सामील होत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपकडे खेचण्यासाठी स्थानिक पातळीवर छोट्या मोठ्या कुरघोड्या होतच राहतात.

त्यातच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नमो रमो नवरात्रोत्सवच्या मंचावर एक विधान केले आहे. येत्या निवडणुकीत एनडीएचे 405 खासदार निवडून आणायचे आहेत. त्यातील एक कल्याण लोकसभेचा देखील खासदार असेल असे मंत्री म्हणाले. मंत्री चव्हाण यांनी विजयादशमीला केलेले हे वक्तव्य काय सूचित करत आहे ते आता पहावे लागेल

डोंबिवली मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वतीने नमो रमो नवरात्रोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. 9 दिवस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या उत्सवाला मिळाला. विजयादशमीच्या दिवशी मंत्री चव्हाण यांनी कुटुंबासमवेत देवीची आरती केली. यानंतर नागरिकांचे आभार मानताना त्यांनी एक आवाहन देखील केले.

मंत्री चव्हाण म्हणाले, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2014 पासून आज पर्यंत 9 वर्षामध्ये आपल्या देशाची आणि भारताची प्रचिती संपूर्ण जगामध्ये ज्या पद्धतीने पसरवली आहे. तुम्हाला आम्हाला या सर्वांना याचा गर्व आहे.

म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्वात आम्ही या देशाला महासतेकडे नेण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढवायचे आणि म्हणून या व्यासपीठावरून मी विनंती करणार आहे.

आपल्या सर्वांना या देशांमध्ये एनडीए चे जवळजवळ 405 खासदार निवडून आणायचे आहे आणि त्यामधील एक खासदार कल्याण लोकसभेचा असला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करा आपण दर वेळेला सहकार्य करता या वेळेला हे मताधिक्य एवढा मोठ असलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणि देवेंद्रजींनी आपल्या सर्वांना ही विनंती केली आहे हा महाराष्ट्र उत्तर प्रदेश नंतर सर्वात जास्त खासदार देणारा राज्य असले पाहिजे. त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण काम करूया.

राजकारणातून माजी खासदार निलेश राणे यांची निवृत्ती आणि सिंधुदुर्गची लोकसभेची जागा रवींद्र चव्हाण लढवू शकतात, ही चर्चा...

दरम्यान सक्रीय राजकारणातून बाहेर पडण्याची माजी खासदार निलेश राणेंची घोषणा केली आणि निवडणुका वगैरे लढण्यात रस राहिला नसल्याचं ट्विट ही केलं. त्यामुळे एकीकडे राजकारणातून माजी खासदार निलेश राणे यांची निवृत्ती आणि देशांमध्ये एनडीएचे जवळजवळ 405 खासदार निवडून आणायचे आहे आणि त्यामधील एक खासदार कल्याण लोकसभेचा असला पाहिजे,

असे वक्तव्य डोंबिवलीत कॅबिनेट मंत्री चव्हाण यांनी केल्याने सिंधुदुर्गची लोकसभेची जागा रवींद्र चव्हाण लढवू शकतात आणि कल्याण लोकसभेची जागा खासदार श्रीकांत शिंदे हेच लढवतील अशी चर्चा आता सुरु झाली.दरम्यान या चर्चेवर अद्याप मंत्री चव्हाण यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाहीं, त्यामुळे मंत्री चव्हाण आता काय प्रतिक्रिया देतात हे पहावे लागेल...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi IPL Auction: नावातच 'वैभव'! १३ व्या वर्षी सूर्यवंशी झाला करोडपती; द्रविडच्या मार्गदर्शनाखाली RR कडून खेळणार

Car Accident : इंदापूरजवळ कारच्या अपघातात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे गंभीर जखमी

IPL Auction 2025: कोण आहे गुरजपनीत सिंग, ज्याच्यासाठी CSK ने ३० लाखापेक्षा ७ पटीने पैसे ओतत कोट्यवधी रुपयांना केलं खरेदी

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

Winter Tourism : नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या उत्तराखंडमधील सात हिल स्टेशन्स तुमची वाट पाहत आहेत

SCROLL FOR NEXT