bjp vs shrikant shinde kalyan) sakal
मुंबई

Kalyan Loksabha: श्रीकांत शिंदेंसाठी कल्याणची आव्हानं संपेनात; गणपत गायकवाडांच्या पत्नीनं घेतली ठाकरेंच्या उमेदवाराची भेट

Shinde Vs Thackeray and Bjp: या विरोधाचा गुढीपाडव्यानिमित्त आज कल्याणच्या शोभा यात्रेत नवा अध्याय लिहिला गेला आहे की काय? |Has a new chapter been written in Kalyan's Shobha Yatra today on the occasion of Gudi Padva of this protest?

Chinmay Jagtap

Kalyan Loksabha 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे टेन्शन वाढणार की काय? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. (cm eknath Shinde)

याचे कारण म्हणजे, आज गुढीपाव्यानिमित्त शिंदेंचे कट्टर विरोधक असलेले आणि कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड (sulbha Gayakwad) यांनी शिंदें विरोधात उमेदवारी करणाऱ्या वैशाली दरेकर यांची भेट घेतली.(vaishali Darekar)

गेल्या काही दिवसांपासून कल्याण लोकसभेचे राजकारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. याचे कारण म्हणजे श्रीकांत शिंदे यांना होणारा भारतीय जनता पक्षाकडून विरोध. मात्र आता या विरोधाचा गुढीपाडव्यानिमित्त आज कल्याणच्या शोभा यात्रेत नवा अध्याय लिहिला गेला आहे की काय? असे चित्र पाहिला मिळत आहे.(bjp vs shrikant shinde kalyan)

याचे कारण म्हणजे, कल्याण पूर्व येथील गुढीपाडवा स्वागत यात्रेत कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी कथीत पोलिस स्टेशन गोळीबार प्रकरणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असणारे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या ही या ठीकाणी उपस्थित होत्या.

यावेळी दोन्ही महिला नेत्यांनी एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. याच बरोबर एकमेकांसोबत फोटोही काढले. यामुळे याचे पडसाद निवडणुकीत पाहायला मिळतील अशी चर्चा होत आहे.(kalyan gudipadava celebration)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT