मुंबईः कल्याणमधील दोन वर्षांपासून रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाला वेग आला आहे. चौथ्या टप्यात पत्रीपूल गर्डर ठेवण्याचे काम सोमवारपासून म्हणजेच 19 ऑक्टोबर ते गुरुवार 22 ऑक्टोबर रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे पत्रीपुलावरील वाहतूक बंद करण्यात येईल. या आठवड्यात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाची टीम सुरू असलेल्या पत्रीपूल कामाची पाहणी करण्यासाठी येणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पत्रीपुलाचे काम अंतिम टप्यात आहे. चौथ्या टप्प्यातील नवीन पत्रीपुलाचे गर्डर ठेवण्याचे काम करण्यासाठी मोठी क्रेन बाजूच्या पुलावर ठेवून गर्डर ठेवण्याचे काम 19 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबरपर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 या काळात काम करण्यात येणार असल्याने या परिसरमधील वाहतुकीत बदल केलेत.
कल्याणमधून पत्री पूल मार्गे शिळफाट्याकडे जाणाऱ्या जड / अवजड वाहनांना राजनोली नाका येथे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून रांजनोली नाका भिवंडी येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वरून खारेगाव टोलनाका - मुंब्रा बायपास मार्गे पुढे जावे.
कल्याण शहरातून पत्री पूल मार्गे शिळफाटा कडे जाणाऱ्या मध्यम आणि हलक्या वाहनांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या वाहनांनी दुर्गामाता चौकातून डाव्या बाजूने आधारवाडीचौक, खडकपाडा चौक भवानी चौक (प्रेम ऑटो सर्कल), नेताजी सुभाष चौकमधून पुढे इच्छित स्थळी जातील.
19 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर रात्री 10 ते पहाटे 5 या रात्रीचे वाहतूक मध्ये बदल केल्याने नागरिकांनी पर्यायी वाहतूक मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन कल्याण पूर्व कोळशेवाडी वाहतूक पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांनी केले आहे.
----------------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Kalyan Patripul night traffic on the bridge closed till Thursday
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.