कल्याण : मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असलेल्या कल्याण रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत स्थानकासह परिसराचा चेहरामोहराही बदलण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रस्ताव तयार केला असून तीन टप्प्यांत हे काम होणार आहे.
कल्याण हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असूनही येथून लोकल आणि मेल गाडी गेल्यानंतर त्यांना बाहेर क्रॉसिंगमुळे थांबावे लागते. त्यामुळे रेल्वेचे पुढील वेळापत्रक कोलमडत असल्याने लोकल आणि मेल गाडीचे मार्ग वेगवेगळे असावेत, अशी प्रवाशांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेला रेल्वेच्या यार्ड- कारशेडच्या जागेत कल्याण रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात येणार आहे. कल्याण रेल्वे स्थानकामधून रोज साधारण 800 लोकल, 200 मेल आणि 40 ते 50 मालगाड्या धावतात. सुमारे सहा लाखांच्या आसपास प्रवासी या स्थानकामधून प्रवास करतात. त्यामुळे स्थानकाचा कायापालट झाल्याने प्रवाशांचीही सोय होणार आहे.
पहिले क्रॉसिंग बंद
मेल, मालगाडी आणि लोकल आदी कल्याण रेल्वे स्थानकामधून धावतात. आठ फलाट असल्याने कर्जत, कसारा आणि मुंबईवरून या गाड्या क्रॉसिंगवर थांबतात. यामुळे वेळ वाया जातो. तो वेळ वाचवण्यासाठी पहिले क्रॉसिंग बंद करण्यात येणार असल्याने लोकल सरळ रेल्वे स्थानकात येणार आहे; तर यार्ड आणि स्टेशनमधील कार्यालय आणि हॉटेल हलवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
मालगाडीचे टर्मिनस बनणार
कल्याण यार्ड (कारशेड)मध्ये भव्य जागा असल्याने मालगाडीचे टर्मिनस बनवण्याचा प्रस्ताव असून त्या बाजूला मेल गाड्या थांबण्यासाठी वेगळे टर्मिनस बनवण्यात येणार आहे. कारशेड परिसरात तांत्रिक विभागाची अनेक कार्यालये असून ती शिप्ट करून नव्याने बांधकाम करायचे असून याबाबत सर्व्हे पूर्ण झाला असून निविदा प्रकियेला सुरुवात झाली आहे. यार्डमधील बांधकाम जमीनदोस्त करून जमीन सपाटीकरण करून मग फलाट बनवण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून कल्याण ते कर्जत, कल्याण ते कसारा आणि कल्याण ते सीएसएमटी रेल्वे प्रवास सुखकर होऊन वेळही वाचणार आहे.
(संपादन : वैभव गाटे)
Kalyan railway station will be renovate decision of railway administration
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.