Vishwanath Bhoir ESakal
मुंबई

Kalyan: कोट्यवधींचे घोटाळे करणाऱ्यांना दिड हजारांचे मोल कसे कळणार, विश्वनाथ भोईरांचा मविआवर हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा

Dombivali News: कोट्यावधींचे घोटाळे करणाऱ्या लोकांना दिड हजार रुपयांचे मोल कसे कळणार? मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या राज्यातील भगिनींसाठी दीड हजार रुपये ही खूप मोठी रक्कम आहे.

अशा शब्दांत कल्याण पश्चिमचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला.

कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या उंबर्डे - कोळीवली विभागीय शाखेतर्फे आयोजित लाडकी बहीण संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील शेकडो लाभार्थी महिलांनी मोठी गर्दी केली होती. या लाभार्थी महिलांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील गाण्यावर उपस्थित लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरल्याचेही दिसून आले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आल्यापासून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोध केला आहे. काहींनी तर आमचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद करू अशी जाहीर घोषणाही केली आहे. परंतु आतापर्यंत ज्या लोकांनी राज्यामध्ये कोट्यवधींचे आर्थिक घोटाळे केले आहेत.

अशा व्यक्तींना हे दिड हजार रुपये म्हणजे शुल्लक वाटत आहेत. मात्र राज्याच्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणीसाठी या दिड हजारांचे मोल खूप जास्त असल्याचे मत आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यास ही योजना अव्याहतपणे सुरू राहील. इतकेच नाही तर त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचे ठोस आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याची आठवण आमदार भोईर यांनी यावेळी करून दिली. आणि आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहनही केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT