kishori pednekar  file photo
मुंबई

कांदिवली बोगस लसीकरण: महापौर पेडणेकरांचे महत्त्वाचे वक्तव्य

मुंबई महानगर पालिकेने थेट 'सीरम'ला पत्र लिहून केली विचारणा

विराज भागवत

मुंबई महानगर पालिकेने थेट 'सीरम'ला पत्र लिहून केली विचारणा

कांदिवली आणि आणखी काही ठिकाणी लसीकरणाच्या बाबतीत फसवणूक झाली. या संदर्भात आम्ही सीरमला पत्र पाठवलं आहे. कांदिवलीमधील बोगस लसीकरण झालं ती वाक्सिन त्यांचीच आहे का? अशी विचारणा सीरमला करण्यात आली आहे. तसेच, घडलेल्या घटनेची चौकशी पालिका प्रशासन आणि पोलीस दलाकडून योग्य पद्धतीने सुरू आहे", अशी प्रतिक्रिया बोगस लसीकरणाच्या मुद्द्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. सध्या आमचे अधिकारी लसीकरण होत असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी आणि तपासणीही करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. त्या मुंबईत बोलत होत्या. (Kandivali bogus Vaccination Mumbai BMC Mayor Kishori Pednekar Reaction Letter to Serum)

"लसीकरणाचा विषय महत्त्वाचा आहे. व्यवसायानुसार सुपरस्प्रेडर गट आहेत. त्यात फेरीवाले, टॅक्सीचालक तसेच १८ ते ४४ वयोगतील नागरिकांचे विविध टप्पे करून लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे. तरुणांच्या लसीकरणाला वारंवार ब्रेक लागला आहे. खासगी सेंटरमध्ये पैसे देऊन लोकांनी लसी घेतल्या आहेत. सर्वसामान्य मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आपण महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. सर्वांनाच मोफत लसीकरण सुरू आहे, तेव्हापासून आपण लसीकरण करतोय. अगदी डोअर-टू-डोअर शक्य नाही पण ५ ते १० मीटरच्या आतील सोसायट्यांमध्ये लसीकरण व्हायला हवं. लस उपलब्ध झाली तर आम्ही लवकरच सरसकट लसीकरण सुरू करू", असे महापौर म्हणाल्या.

"प्रत्येक नगरसेवकाच्या वार्डात 1 लसीकरण सेंटर असायला हवं. आपण दोनच्या वर सेंटर उभारली आहेत. काही सोसायट्या स्वत:हून जॉईन होत आहेत. सोसायट्यांचे व्यवस्थापक सगळी काळजी घ्यायला तयार आहेत. त्यामुळे समन्वय साधून सगळी पुर्तता केली, तर कमी वेळात जास्त लसीकरण होईल. तिसरी लाट अधिकच भयानक असेल, त्यामुळे लसीकरण होऊनही काळजी घ्यावी लागणार आहे", असा इशारा त्यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT