नवी मुंबई - कर्नाळा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ७६ जणांवर पनवेल शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेकाप नेते, माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यावर देखील गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याचसोबत संचालक मंडळावर असणाऱ्या १४ सदस्यांवर देखील गुन्ह्याची नोंद झाली आहे. तब्ब्ल ६३ जणांच्या खात्यावर बनावट कागदपत्र सादर करून ५१३ कोटींच्यावर कर्ज काढण्यात आलीत असे आरोप केले जातायत. या ६३ जणांवरदेखील गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. यातील अनेकजण हे शेकाप पक्षाचे पदाधिकारी आहेत.
मोठी बातमी - उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज
पैसे मिळत नसल्याने ठेवीदार आक्रमक
कर्नाळा बॅंकेतील ठेवीदार, खातेदारांना आश्वासन देऊनसुद्धा पैसे मिळाले नाहीत. बॅंकेतील हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी कर्नाळा बॅंक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून पनवेल येथील कर्नाळा बॅंकेच्या मुख्य शाखेवर भव्य मोर्चा देखील काढला होता. या मोर्चामध्ये हजारो ठेवीदार सहभागी झाले होते.
कर्नाळा बॅंकेत ५१३ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. बॅंकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील हे ठेवीदारांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने हजारो कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ठेवीदारांना न्याय मिळावा, यासाठी माजी खासदार किरीट सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी कर्नाळा बॅंक ठेवीदार संघर्ष समिती कार्यरत केली आहे.
karnala co operative bank scam case registered on vivek patil and 75 others
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.