monkey breaks dahihandi sakal media
मुंबई

'बजरंग बली की जय' ; कासा येथे वानराने फोडली दहीहंडी

महेंद्र पवार

कासा : 'बजरंग बली कि जय' म्हणत गोविंदा पथक दहीहंडी (Dahihandi festival) फोडण्यासाठी फिरत असल्याची दृश्य आपण नेहमीच बघत आलो आहोत. दरवेळी कृष्ण (lord shree Krishna) हंडी फोडतो हेही आपल्याला माहिती आहे. परंतु आज मात्र चक्क एका वानराने (monkey) दहीहंडी फोडून सर्वांना आश्चर्याचा (people shocking scene) धक्का दिला आहे. दरवर्षी प्रथेप्रमाणे गोपाळकाला हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मानाची दहीहंडी म्हणून जवळपास 25 ते 30 हजार रुपये खर्च करून मोठया डीजेच्या आवाजात बाळगोपाळ गोविंदा पथक जय बजरंग बळी कि जय , गोविंदा आला रे आला , असे म्हणत नाचत गाजत दहीहंडी फोडत असतात.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावाने सण उत्सव यावर निर्बंध असल्याने परंपरा जपण्यासाठी दहीहंडीचा कार्यक्रम केला जात आहे. त्यानुसार कासा येथील सदाशिव उपहार गृह हॉटेल समोर नेहमीप्रमाणे दहीहंडी बांधण्यात आली होती. कोणतेही गोविंदा पथक यावर्षी नसल्याने ही हंडी फोडावी कशी अशा विचारात नागरिक असताना अचानक एक वानर झाडावरून दहीहंडी फोडण्यास अवतरले. हंडीवर असलेली फळे आणि केळी पाहून त्याने झाडाला लटकत नारळ घेऊन दहीहंडी फोडली आणि बांधलेली केळी फस्त केली आणि निघून गेले. नागरिकांची समस्या चुटकीसरशी सोडविली. तेथे जमलेल्या अनेकानी हा प्रसंग व्हिडिओमध्ये चित्रित केला. वानरांच्या रूपात गोविंदा येऊन दही हंडी फोडून निघून गेला अशी चर्चा मात्र परिसरात चांगलीच रंगली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT