kasara ghat highway waterfall sakal
मुंबई

Waterfall : कसारा घाटातील महामार्गावरील धबधब्यावर हौशी पर्यटकामुळे अपघात होण्याची शक्यता

नरेश जाधव

खर्डी - कसारा घाटातील मुंबई-नाशिककडे येणाऱ्या-जाणाऱ्या महामार्गावरील रस्त्यालगत असणाऱ्या डोंगरावरून वाहणाऱ्या नैसर्गिक धबधब्यावर प्रवासी आपल्याकडील वाहन थाबवून धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत असल्याने येथे वाहनांची व पर्यटकाची वर्दळ वाढत असून वहातुक कोंडी होत असल्याने येथे अपघात होऊन नाहक प्रवाश्याचा बळी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ह्या ठिकाणी वाहनांच्या लाबच्या लाब रांगा लागत असून हौशे गवशे नवसे धबधब्यावर कुटूंबासोबत गर्दी करून वहातुक कोंडी निर्माण करत आहेत. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, पोलिसांनी या हौशी पर्यटकांवर आवर घालण्याची मागणी जोर धरत आहे. गेल्या 12 दिवसांपूर्वी येथे 5 गाड्यांचा अपघात होऊन 9 जण जखमी झाले होते. पोलिसांनी येथे लावलेले बॅरिकेट्स बाजूला करून पर्यटक धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत असून पर्यटकांची वाहने येथे उभी राहत असल्याने येथे वहातुक कोंडी होऊन अपघात होत असतात.

कसारा घाटातील नाशिक-मुंबईकड़े येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यात वाकणाच्या ठिकाणी मोठमोठे धबधबे असून येथे अनेक ये-जा कुटूंब धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत आहेत. ह्या ठिकाणी वनविभागाकडून वाहन न थांबण्याचा बोर्ड लावलेला असूनही धबधब्याचा आनंद घेण्यासाठी लहान गाड्यातील बायका-पोर, तरुण -तरुणी प्रवाशी थांबत असल्याने वहातुक कोड़ी होत आहे.

तसेच धबधब्यावरून कोसळणाऱ्या पाण्याससोबत दरड कोसळण्याची शक्यता असल्याने यासाठी कसारा पोलिसांनी व रस्त्याच्या ठेकेदाराने येथे प्रवाश्यानी थांबु नये यासाठी सुरक्षा उपाय योजना करून नाहक कोणाचा अपघात होऊन बळी जाणार नाही. याची काळजी घ्यावी व नाहक वाहने थांबवून वहातुक कोंडी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी जड़ वाहन चालक करीत आहेत.

ह्याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून येथे थांबणाऱ्या वाहनांना अटकाव करण्याची गरज आहे.तर संबंधित ठेकेदाराने धबधब्यावर सुरक्षाचे उपायकरणे गरजेचे आहे.

'नाशिक कडून येताना उतार असल्याने गाड्या जोरात येतात,परंतु येथे लहान गाड्या दाटीवाटिने उभ्या असल्याने गाड्यावरिल ताबा सुटल्यास मोठा अपघात होऊन जीवितहानी होउ शकते. यासाठी येथे पोलिसांनी येथे गाड्या उभ्या करण्यास मनाई करावी.

- रामदास धोंगडे/रमीज शेख, जड़वाहन चालवीणारे चालक.

'कसारा घाटात पर्यटक थांबत असल्याने महामार्गावर पोलीस गस्त घालत असून, धबधब्याच्या ठिकाणी ब्रेकेट्स लावण्यात आले असून, येथे वहातुक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात येईल.

- डी. के. कोल्हे, पोलीस निरीक्षक, कसारा.

कोकणाचे प्रवेशद्वार म्हणजे निसर्गाने नटलेल्या शहापूर तालुक्यात कसारा घाटात अनेक वळणावर पावसाळ्यात धबधबे निर्माण होत असल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना धबधबे आपल्याकडे आकर्षित करत असल्याने प्रवाशी थांबत असतात.या कसारा घाटातील रस्त्याच्या बाजूला माळशेज घाटाप्रमाणे विकास झाल्यास अनेक पर्यटक थांबतील, लहान धबधबे, बाजूला अशोका धबधबा अशी पर्यटन स्थळे असल्याने स्थानिक आदिवासी बांधवांना पर्यटकांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल.

- पांडुरंग बरोरा, माजी आमदार, शहापुर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT