रविवार सुट्टीचा दिवस आणि त्यातच विश्वचषकाची फायनल मॅच असल्यामुळे शहरात सगळीकडे क्रिकेतमय वातावरण निर्माण झाले आहे. मित्रमंडळी, परिवारासोबत मॅचचा आनंद घेता यावा यासाठी आधीच हॉटेल्स, ढाबे अनेकांनी बुक केले आहेत. हॉटेल्स चालक, राजकीय मंडळी यांनी देखील क्रिकेट प्रेमींसाठी भल्या मोठ्या एलईडी स्क्रिन लावले आहेत.
सोसायटी धारकांनी देखील सोसायटी आवारात लेडीज स्क्रीन लावला आहे. मात्र आयत्यावेळी हा प्लॅन करणाऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. दोन दिवसांपूर्वीच सर्व स्क्रिन बुक झाल्या असून मागणीकर्त्यांना स्क्रिन मिळत नसल्याने घरातच शेवटी अनेकांनी बेत आखले.
रविवारी क्रिकेट विश्वचषक असल्याने भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरचा सामना पाहण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे बेत आखले आहेत. तसेच क्रिकेटपटू विराट याचा विक्रम, शमीची अनोखी खेळी पाहता यावी. मित्रांसोबत या खेळाचा आनंद घेता यावा यासाठी अनेकांनी हॉटेल्स, ढाबे बुक केले आहेत. काही ठिकाणी सोसायटी आवारात, क्लब हाऊस यामध्ये सामना मोठ्या स्क्रिनवर पहायची सोय केली आहे. तसेच राजकीय मंडळी यांच्या वतीने देखील ठराविक चौकात एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. 100 ते 150 फुटाचा एलईडी स्क्रिन अगोदरच सोसायटी पदाधिकारी, काही राजकीय मंडळींनी नोंदणीकृत केल्या होत्या.
यामुळे आयत्या वेळी एलईडी स्क्रिनची मागणी करणाऱ्यांना स्क्रिन उपलब्ध होत नसल्याचे सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासोबतच उत्तर भाषिक समाज मंडळांनी आपल्या वस्त्यांमध्ये एलईडी स्क्रिन लावून छट पूजेचा आनंद बसल्या जागी घेण्याचे नियोजन केलेले आहे.
तर गुजराती समाजाची वस्ती असलेल्या भागात जलाराम जयंती साजरी करण्यात येत असल्याने त्यासाठी एलईडी स्क्रिन लावण्यात आली आहे. यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात एलईडी स्क्रिन व प्रोजेक्टरला मागणी आली असून वाढीव एलईडी स्क्रिन मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली परिसरात उपलब्ध नसल्याची माहिती डोंबिवलीतील एलईडी स्क्रिन पुरवठादार जतीन जोशी यांनी दिली.
उल्हासनगर ते डोंबिवली परिसरात साधारण 40 ते 50 एलईडी स्क्रिन पुरवठादार आहेत. या पुरवठादारांकडील स्क्रिन अगोदरच रविवारच्या विश्वचषक सामन्यासाठी बुक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयत्यावेळी एलईडी स्क्रिन लावून घेण्यासाठी प्रयत्नशील असलेले संयोजक, आयोजक एलईडी स्क्रिनसाठी मुंबई ते उल्हासनगर भागात धावाधाव करत होते.
पण त्यांना स्क्रिन मिळत नसल्याचे पुरवठादारांनी सांगितले. साधारण 100 चौरस फुटाचा एलईडी स्क्रिन सुमारे 10 ते 15 हजार रूपये भाड्याने दिला जातो. हाच स्क्रिन आता 25 ते 30 हजार रूपये भाड्याने घेतले गेले आहेत.
विश्वचषकाचा सामना एकत्रित बसून पाहण्यात वेगळी मजा असते. त्यामुळे अनेकांनी बेत आखले आहेत. बाहेर जाता न आलेल्या मंडळींनी घरातच टीव्ही वर हा सामना पाहणे पसंत केले. घरातच बेत आखले गेल्याने स्विगी, झोमॅटो यांना मागणी वाढली आहे.
दोन दिवसांपासून आम्ही स्क्रिन शोधत आहोत. आम्ही वाढीव भाडे देण्यास तयार असुनही एलईडी स्क्रिन उपलब्ध नसल्याचे डोंबिवलीकर अनिकेत जाधव यांनी सांगितले. रविवारी एवढ्या प्रमाणात एलईडी स्क्रीनला प्रथमच एवढी मागणी आल्याने तुटवडा जाणवल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.