मुंबई : जळगावमधून आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी व मुंबईत डाॅक्टर बनण्यासाठी आलेल्या एका पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. २७ वर्षीय डॉ. आदिनाथ पाटील असे त्याचे नाव असून हा विद्यार्थी केईएम रुग्णालयाच्या औषधविभागशास्त्र विभागांतर्गत पदव्युत्तर शिक्षण घेत होता.
त्याचे कुटुंब सध्या जळगाव मधून निघाले असून त्याचा मृतदेह केईएम रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे. मानसिक ताणातून आत्महत्या करून त्याने जीवन संपवल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलीस त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी करत आहेत.
काही दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयातील महिला आणि पुरुषांचा वाॅर्ड शिवडी टीबी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आला आहे. त्यानंतर, तो दोन्ही ठिकाणी उपचार देत होता. रविवारी रात्री तो ऑनड्युटी होता. रात्री एका रुग्णाच्या इकोसाठी तो केईएममध्ये आला होता. रात्री त्याने रजिस्टार सोबत जेवण देखील केले.
मात्र, पुन्हा परतल्यानंतर रात्री शिवडी टीबी रुग्णालयात इंजेक्शन घेवून आत्महत्या केल्याचे समजते. सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे ओपीडीला न आल्याने त्याच्यासोबतच्या डाॅक्टरांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. त्याने, दरवाजा खोलला नाही म्हणून परिचारिकेने मागच्या बाजूने दरवाजा उघडला. तेव्हा तो मृत अवस्थेत आढळला.
मानसिक तणावातून आत्महत्या?
केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. संगीता रावत यांनी सांगितले की, मानसिक ताणातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक समजले आहे. त्याचे वडील काही महिन्यांपूर्वी येऊन त्याच्यासोबत राहिले होते. आता कुटुंब दाखल होत आहे.
पोस्ट मार्टम अहवालात नेमके कारण स्पष्ट होईल. अत्यंत हुशार आणि हसमुख विद्यार्थी होता. त्याच्याविषयी कोणतीही तक्रार नव्हती. मेहनत घेऊन केईएम मध्ये प्रवेश मिळणे हे फार महत्त्वाचे असते. त्याचा भाऊ ही केईएम मध्ये शिकत आहे.
त्याचे आज टीसीएसला प्रेझेंटेशन होते. मुलांनी ताणातून कोणतेही पाऊल उचलू नये म्हणून आम्ही हेल्पलाइन ही सुरू केली आहे. पण, त्याने कोणालाही काहीही सांगितले नव्हते.
मृत्यूबाबत संशय
दरम्यान,अभिजीतने उजव्या हातावर इंजेक्शन घेतल्याचे दिसते. शिवाय, त्याच्या हातावर काही खुणा ही दिसत आहेत. तसंच, उजव्या हाताने उजव्या हातावर इंजेक्शन घेणे अवघड असते. त्यामुळे, या विद्यार्थ्यासोबत झटापट झाली का असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व घटनेचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.