Kirit Somaiya and Yashwant jadhav Sakal Digital
मुंबई

'दोन वर्षात ३६ इमारती, १००० फ्लॅट्स आणि एक हजार कोटींचा घोटाळा'

ओमकार वाबळे

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने यामागे राजकीय षडयंत्र असल्याचं सेनेच्या नेत्यांनी म्हटलं होतं. यानंतर राजकीय वातावरणही तापलं. (Yashwant Jadhav IT Raid)

आता या प्रकरणात आता किरीट सोमय्यांनी उडी घेतली आहे. आयकर विभागाच्या चौकशीत काही महत्वाचे तपशील हाती लागले आहेत. याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सोमय्यांनी ट्वीट करत आमदार यामिनी जाधवांची संपत्ती २४ महिन्यात वाढल्याचं सांगितलं. (Kirit Somaiya Alleges Yashwant Jadhav Over Corruption)

यशवंत जाधवांसह त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांचीही आयकर विभागाने चौकशी केली होती. आता सोमय्यांनी त्यांच्यावर निशाणा साधत दोन वर्षात जाधव कुटुंबीयांनी ३६ इमारती विकत घेतल्या असून १००० सदनिका, गाळे आणि ऑफिसेस घेतल्याचा दावा केला आहे. २४ महिन्यात केलेल्या एक हजार कोटींच्या भ्रष्ट्राचाराचा पर्दाफाश झाला, असं ट्वीट सोमय्यांनी केलंय. येत्या काही दिवसांत ईडी आणि प्राप्तिकर विभागाकडून होणाऱ्या कारवाईवर मला विश्वास आहे, असं सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्या यांनी काल महाविकास आघाडी सरकारच्या १२ नेत्यांची यादी जाहीर केली होती. डर्टी डझन्स असं त्यांनी संबोधलं होतं. आणि या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं सांगितलं. यामध्ये जाधव यांचं नाव नव्हतं. आता स्थायी समितीच्या अध्यक्षावरच आयकर विभागाचा छापा पडल्यानंतर सोमय्यांनी नवी यादी जाहीर केली.

यामध्ये यशवंत जाधव, मुंबईच्या महपौर किशोरी पेडणेकर आणि यामिनी जाधवांच्या नावांचा समावेश आहे. याआधी सोमय्यांनी बारा नेत्यांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अनिल परब,संजय राऊत, सुजीत पाटेकर, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या नावांचा समावेश आहे.

कोणत्या वर्षात किती मालमत्ता खरेदी ?

  • 2020 - 07

  • 2021 - 24

कोणत्या महिन्यात किती मालमत्ता खरेदी ?

  • मार्च 2020 - 1

  • डिसेंबर 2020 - 2

  • जानेवारी 2021 - 3

  • फेब्रुवारी 2021 - 2

  • मार्च 2021 - 5

  • मे 2021 - 1

  • जून 2021 - 2

  • जुलै 2021 - 6

  • ऑगस्ट 2021 - 2

  • डिसेंबर 2021 - 3

मालमत्तेचा पत्ता आणि किंमत

  • वॉटर फिल्ड 5 कोटी 10 लाख

  • क्रॉस रोड IV, वांद्रे

  • बिलखाडी चेंबर्स 2 कोटी

  • माझगाव

  • वाडी बंदर, माझगाव 1 कोटी 60 लाख

  • व्हिक्टोरीया गार्डन2 कोटी 20 लाख

  • भायखळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT