Kiriti Somaiya, Korlai Team eSakal
मुंबई

यशवंत जाधव यांच्यावर कारवाईची मागणी घेऊन सोमय्या दिल्लीत

किरीट सोमय्या यांनी स्वत: याबद्दलची माहिती दिली आहे.

सुधीर काकडे

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे (BMC Standing committee) माजी अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant jadhav) यांनी २४ महिन्यांत ३६ मालमत्ता विकत घेतल्या असल्याचा आरोप आज भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला. जाधव यांची एवढी मालमत्ता असेल तर त्यांच्या नेत्यांकडे किती असेल, असा प्रश्‍नही सोमय्या यांनी केला. त्यानंतर आता यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्यांनी दिल्ली गाठली आहे.

किरीट सोमय्या यांनी स्वत: ही माहिती दिली असून, काही वृत्तपत्रांची कात्रणं देखील त्यांनी यावेळी शेअर केली आहे. यशवंत जाधव यांच्या १००० कोटींच्या संपत्तीच्या कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत आपण काही लोकांच्या भेटीगाठी देखील घेणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेची चिंता वाढल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी काल महाविकास आघाडी सरकारच्या १२ नेत्यांची यादी जाहीर केली होती. डर्टी डझन्स असं त्यांनी संबोधलं होतं. आणि या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं सांगितलं. यामध्ये जाधव यांचं नाव नव्हतं. आता स्थायी समितीच्या अध्यक्षावरच आयकर विभागाचा छापा पडल्यानंतर सोमय्यांनी नवी यादी जाहीर केली.

यामध्ये यशवंत जाधव, मुंबईच्या महपौर किशोरी पेडणेकर आणि यामिनी जाधवांच्या नावांचा समावेश आहे. याआधी सोमय्यांनी बारा नेत्यांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अनिल परब,संजय राऊत, सुजीत पाटेकर, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या नावांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT