मुंबई : मागील दोन आठवड्यांपूर्वी कोकणातील (konkan) काही जिल्हयांमध्ये झालेल्या अतिवृष्टींमुळे (heavy rainfall) ज्या विद्यार्थ्यांच्या विविध अभ्यासक्रमांच्या पदवी (degree syllabus) आणि गुणपत्रिका (marksheets) आदी प्रमाणपत्रांचे नुकसान भरून काढण्यासाठी मुंबई विद्यापीठाने (Mumbai university) पाऊल उचलले आहे. ( konkan-heavy rainfall-degree syllabus-marksheets-Mumbai university-nss91)
यासाठी ज्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचे नुकसान झालेले आहे, त्यांना अगदी मोफत ही कागदपत्रे विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिले जाणार असून त्यासाठी विद्यापीठाने दुय्यम प्रतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका अनेक गावांना आणि शहरांनाही बसला आहे. यात महाड, चिपळूण आदी शहरांनजीकच्या अनेक गावात अनेक घरे पाण्याखाली गेली होती. त्यात ज्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रके आणि पदवी प्रमाणपत्रे गहाळ झाल्याची आहे.
अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्राच्या दुय्यम प्रती विद्यापीठाकडून निशुल्क पुरविण्यात येणार आहेत. या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रांच्या दुय्यम प्रती विद्यार्थ्यांच्या संबंधित महाविद्यालयांना पाठविण्यात असून यासाठी विद्यार्थ्यांनी शासकीय पंचनाम्याच्या प्रतीसह माहिती certificate_help@exam.mu.ac.in या ई-मेल आयडीवर विद्यापीठाकडे सादर करावी असे आवाहन विद्यापीठाच्या परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.