Kokan Railway sakal
मुंबई

Kokan Railway: गणेशोत्सवानिमित्त भक्तांसाठी १० मेपासून आरक्षण खुले; सप्टेंबरपासून उत्सवाची धामधूम

रेल्वेगाड्यांचे आरक्षण १२० दिवस आधी म्हणजेच १० मे पासून खुले होणार असल्याने गणेशभक्त कमालीचे सुखावले| Ganesha devotees were extremely happy as the reservation of railway trains will be opened 120 days in advance i.e. from 10 May

सकाळ वृत्तसेवा

Konkan Railway News: यंदा ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. कोकण मार्गावर सोडण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण १२० दिवस आधी म्हणजेच १० मे पासून खुले होणार असल्याने गणेशभक्त कमालीचे सुखावले आहेत. (kokan railway)

नियमित रेल्वेगाड्यांसह ‘गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकीटे मिळवण्यासाठी चाकरमान्यांची तिकीट खिडक्यांवर चढाओढच सुरू होणार आहे.(ganpati in konkan)

गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात डेरेदाखल होतात. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे बूकिंग २ ते ३ मिनिटातच हाऊसफुल्ल होत असल्याने आरक्षित तिकिटांसाठी तिकीट खिडक्यांवर तासनतास ताटकळत उभे राहूनही चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडते. यंदा ७ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे.(kokan ganeshotsav)

गणेशोत्सव कालावधीत कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त सोडण्यात येणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकिटासाठी ऑनलाईनप्रमाणेच तिकीट खिडक्यांवरही गर्दी उसळणार आहे.(how to book kokan railway ticket reservation)

कोकण मार्गावर नेमक्या किती गणपती स्पेशल चालवणार, हे अद्याप रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेले नाही; मात्र, १० मे पासून गणेशोत्सवात धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी येण्याचे नियोजन करणे सुकर होणार आहे.(kokan railway reservation)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT