Kokan Railway sakal
मुंबई

Kokan Railway: कोकणासाठी गणेशोत्सवानिमित्त स्पेशल ट्रेन; जाणून घ्या कधी आणि केव्हा करता येणार बुकिंग !

Mumbai Ganeshutsav:गणपती सणाकरिता काेकणात जाणाऱ्या चाकरमान्याना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Ganpati In Konkon: गणेशोत्सवाकरिता काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या साेयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनातर्फे २०२ गणपती विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या गणपती विशेष गाड्या सीएसएमटी-सावंतवाडी,रत्नागिरी,चिपळूण, कुडाळ करिता या गाड्या धावणार आहे.

या गणपती विशेष गाड्याचे आरक्षण २१ जुलै २०२४ पासून रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरु होणार आहे. त्यामुळे गणपती सणाकरिता काेकणात जाणाऱ्या चाकरमान्याना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०११५१ सीएसएमटी- सावंतवाडी गणपती स्पेशल ट्रेन १ ते १८ सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचणार आहे. ट्रेन क्रमांक ०११५२ ट्रेन दररोज दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचणार आहे.

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावड, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकात थांबा दिला आहे.

ट्रेन क्रमांक ०११५३ सीएसएमटी-रत्नागिरी-सीएसएमटी गणपती स्पेशल ट्रेन १ ते १८ सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी साडे अकरा वाजता निघून त्याच दिवशी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरीला पोहोचणार आहे.

तर ट्रेन क्रमांक ०११५४ गणपती स्पेशल ट्रेन १ ते १८ सप्टेंबर दरम्यान दररोज पहाटे ४ वाजता रत्नागिरी स्थानकातून सुटून दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सीएसएमटी स्थानकांवर पोहचले. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावडाव, आरवली रोड, संगमेश्वर स्थानकात थांबा दिला आहे.

ट्रेन क्रमांक ०११६७ एलटीटी-कुडाळ स्पेशल ट्रेन १ ते १८ सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री ९ वाजता एलटीटी स्थानकांतून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता कुडाळ येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग स्थानकात थांबा दिला आहे. १ ते १८ सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी एलटीटी-सावंतवाडी स्पेशल ट्रेन सुटून त्याच दिवशी रात्री ९ वाजता सावंतवाडी पोहोचणार आहे.

या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग स्थानकात थांबा दिला आहे.

याशिवाय ट्रेन क्रमांक ०११५५-५६ दिवा ते चिपळूण मेमू, ट्रेन क्रमांक ०११८५-८६ एलटीटी ते कुडाळा, ट्रेन क्रमांक ०११६५-६६ एलटीटी ते कु़डाळ स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे. २०२ गणपती विशेष गाड्याचे आरक्षण २१ जुलै २०२४ पासून रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरु होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT