पंकज देशमुख Sakal
मुंबई

पंकज देशमुख यांना ठाकरे गटाकडून कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी निश्चित?

संदीप पंडित

विरार : पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा रणसंग्राम महाविकास आघाडीने अत्यंत चुरशीचा केला असून काल (दि.14 मे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वसईत जाहीर सभा संपन्न झाली. दरम्यान, पालघर लोकसभेसाठी चुरस असताना वसईकरांसाठी आणखी एक सुखद धक्का ठाकरे गटाच्या गोटातून मिळत आहे.

ठाकरे गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांना कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चित होण्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत पालघरमधील शिवसैनिक पंकज देशमुख यांच्या नावाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.

बहुजन विकास आघाडीचे नालासोपाऱ्यातील युवा चेहरा असलेले पंकज देशमुख यांनी बहुजन विकास आघाडीला रामराम करत शिवसेना पक्षाचे शिवबंधन हाती बांधले. दरम्यान, त्यानंतर शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पंकज देशमुख यांनी ठाकरे गटासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या पक्षनिष्ठेचे त्यांना यथोचित बक्षिस मिळून पालघर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली. पक्षनेतृत्वाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत वसई विरार उपप्रदेशात तसेच पालघर जिल्ह्यात पक्षसंघटन वाढवणे, युवा शिवसैनिकांची मोट बांधणे,

पक्षाच्या धोरणांना जनमानसापर्यंत पोहोचवण्याचे काम पंकज देशमुख करत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत कोकण पदवीधर मतदारसंघातून यावेळेस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंकज देशमुख यांच्या नावाचा विचार करत आहेत.

दरम्यान, यावेळेसच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून पंकज देशमुख यांना जवळपास उमेदवारी निश्चित झाली असल्याचे संकेत मिळत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून केवळ त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची प्रतिक्षा पालघर जिल्ह्यातील शिवसैनिकांना आहे.

पंकज देशमुख यांना कोकण पदवधीर मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडुन उमेदवारी जाहीर झाल्यास पालघर जिल्ह्यातून या मतदारसंघासाठी पंकज देशमुख हे पहिला युवा चेहरा ठतील तसेच त्यांचा सामना हा भाजपचे कोकण पदवधीर मतदारसंघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्याशी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT