konkan refinery project sakal
मुंबई

Kokan Refinery Project : 'सुंदर कोकण समृद्ध कोकण' बारसू रिफायनरीविरोधात ठिय्या आंदोलन

विकासाच्या नावाखाली अनेक विनाशकारी प्रकल्प कोकणच्या नावाखाली माथी मारले जात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बारसू येथे प्रस्तावित असलेला विनाशकारी रिफायनरी प्रकल्प कायमचा हद्दपार व्हावा यासाठी मंगळवारी (ता.18) आझाद मैदानात बारसू-सोलगाव पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रगतिक पक्ष आणि संघटनांची व्यापक आघाडी या आंदोलनात उतरली आहे.

बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघर्ष समिती आणि बारसू रिफायनरी विरोधी राज्यव्यापी लढा समिती यांनी संयुक्तपणे हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी सत्यजीत चव्हाण, प्रकाश रेड्डी, नितीन जठार, दीपक जोशी, नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

कोकण ही जैवविविधतेने संपन्न असे विस्तीर्ण पसरलेले सडे, सड्यांवर कोरलेली कातळशिल्पे, नारळी-पोफळी आणि आंव्या-फणसाच्या बागा, स्वच्छ आणि सुंदर असे समुद्रकिनारेअशी कोकणची ओळख आहे. मात्र अलिकडे इथले विस्तीर्ण समुद्र किनारे आणि नैसर्गिक संसाधने कोकणच्या मुळावर उठताहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विकासाच्या नावाखाली अनेक विनाशकारी प्रकल्प कोकणच्या नावाखाली माथी मारले जात आहेत.

कोकणचा भाग असलेला रायगड परिसर तर प्रदूषणकारी प्रकल्पांनी केव्हाच गिळंकृत केला आहे. रोजगाराच्या नावाखाली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रकल्प जनेतेवर लादले जात आहेत. बारसू-सोलगाव परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारून इथला निसर्ग, शेती, मासेमारी, नारळी-पोफळीच्या, आंब्या-फणसाच्या बागा संपवल्या जाणार आहेत.

आता हीच खरी लढण्याची वेळ आहे, असे म्हणत "सुंदर कोकण समृद्ध कोकण" अशी या आंदोलनाची घोषणा असून कोकणातील नैसर्गिक संसाधनांच्या आधारे पर्यावरण संतुलित रोजगार निर्मिती करणारे पर्यायी विकासाचे धोरण राज्य सरकारला घ्यायला भाग पाडण्यासाठी पर्यायांची माडणीही करण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारी १८ जुलै रोजी आझाद मैदान येथे ठिय्या आदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलनात बारसू सोलगाव पंचक्रोशीतील जनतेसोबतच महाराष्ट्रातील विविध जन संघटनांच्या नेतृत्वाखाली लढणारी जनता, मुंबईकर कोकणवासी, पर्यावरप्रेमी, लेखक, कवी, अभ्यासक, विचारवंत, कलावंत या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या आंदोलनाने सरकारचे रिफानरीसंबंधातील धोरणात बदल न झाल्यास हे आंदोलन राज्यव्यापी करण्यात येणार आहे, असे सत्यजीत चव्हाण यांनी जाहीर केले. या आंदोलनात कोकणवासीय, कोकणप्रेमी, पर्यावरणवादी आणि सर्व स्तरातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आसे आवाहन नितीन जठार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT