नवी मुंबई : विनापरवाना (illegal) व असुरक्षितपणे गॅस सिलिंडरचा (Gas Cylinder) वापर करून वडापाव, चायनीज आणि इतर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात (Food traders) पोलिसांची आता करडी नरज आहे. कोपरखैरणे पोलिसांनी (koparkhairne police) विशेष मोहीम (special campaign) सुरू केली असून तीन दिवसांत ११ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करीत गॅस सिलिंडरसह त्यांचे साहित्य जप्त (Material sized) केले आहे. सदर विक्रेते कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना न करता उघड्यावर धोकादायकपणे गॅस सिलिंडरचा वापर करीत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नवी मुंबईत अनधिकृतपणे गॅस सिलिंडरचा वापर करून अनेकांनी पदपथावर खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या लावल्या आहेत. उघड्यावरच खाद्यपदार्थ तयार केले जात असून सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजनांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे पदपथावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काही विक्रेत्यांकडे रात्रीच्या सुमारास दारू पिऊन खाण्यासाठी येणार्यांची गर्दी होत असून महिलांच्या छेडछाड व हाणामारीचे प्रकारही होत असतात. त्यामुळे कोपरखैरणे पोलिसांनी आपल्या क्षेत्रातील अवैधरीत्या व विनापरवाना सुरू असलेले वडापाव, चायनीज व इतर विक्रेत्यांचा शोध घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.