मुंबई - विद्याविहार रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी पहिला ओपन वेब गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने कुर्ला ते भांडुप स्थानकादरम्यान शनिवार- रविवारी विशेष रात्रकालीन वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकल वाहतुकीत बदल करण्यात येणार असून काही लोकल रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकात मुंबई महानगरपालिकेद्वारे विंच मशीन वापरून पूर्व ते पश्चिम दिशेने 'एन' वॉर्डमधील एलबीएस मार्ग ते आरसी मार्ग जोडणारा रोड ओव्हर पुल बांधण्यात येत आहे. यापुलाचा पहिला ओपन वेब गर्डर शनिवारी रात्री टाकण्यात येणार आहे. याकरिता कुर्ला ते भांडुप स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धिम्या आणि जलद मार्गावर तसेच पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री १.१० ते रविवारी पहाटे ४.२० दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.
यादरम्यान शनिवारी रात्री कुर्ला ते ठाणे दरम्यानची लोकल वाहतुक पुर्णपणे बंद राहणार आहे. तसेच सीएसएमटी स्थानकातून रात्री ११.४७ वाजता सुटणारी ठाणे लोकल रद्द केली आहे. रविवारी पहाटे ४ आणि ४.१६ वाजता ठाणे-सीएसएमटी लोकल रद्द केल्या आहेत. शनिवारी रात्री २.३३ ची कर्जत-सीएसएमटी लोकल ठाणे स्थानकापर्यत चालविण्यात येणार आहे. तसेच रविवारी पहाटे ५.१६ ची सीएसएमटी- अंबरनाथ लोकल ठाणे स्थानकातून सुटणार आहे.
मेल-एक्सप्रेसला फटका
११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस, १८०३० शालीमार-एलटीटी एक्सप्रेस ठाणे स्थानकात थांबविण्यात येणार आहे.
१२८१० हावडा-सीएसएमटी मेल दिवा स्थानकात (अप जलद मार्गावर) पहाटे ३.३५ ते ४.१० वाजेपर्यत, १२१३४ मंगलुरु-सीएसएमटी एक्सप्रेस दिवा स्थानकात (सहाव्या मार्गावर) पहाटे ३.४२ ते ४ वाजेपर्यत, १८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस कल्याण स्थानकात पहाटे ३.२९ ते ४ वाजेपर्यत, २०१०४ गोरखपुर-एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस कल्याण स्थानकात पहाटे ३.४८ ते ४ वाजेपर्यत, १२७०२ हैद्राबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्सप्रेस कल्याण स्थानकात पहाटे ३.४८ ते ४.१० वाजेपर्यत थांबविण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.