Ladki Bahin Yojana esakal
मुंबई

Ladki Bahin Yojana : योजना सुरू ठेवण्यासाठी जागरूक राहावे लागणार - एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - महायुती सरकारने मागील दोन वर्षात केलेली विकासकामे त्याचबरोबर राबविण्यात येत असलेल्या लेक लाडकी, लाडकी बहीण यांसारख्या योजना चालू ठेवायच्या असतील तर, जागरूक राहवे लागणार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच पुन्हा महायुतीचे सरकार निवडून आणावे लागेल, असे आवाहन देखील शिंदे यांनी यावेळी केले.

ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारीतील २७ गावातील ग्रामपंचायती मधील कर्मचाऱ्यांचा कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत, सरकार चालविण्यासाठी घरात बसून नव्हे, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करावे लागत असल्याचे सांगितले. आगामी विधानसभा निवडणूकित धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ यांच्या समोरचेच बटन दाबा असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, यानंतर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट, उपवन तलाव, मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटल नळ पाडा, कासारवडवली तलाव, श्रीराम मंदिराजवळ, घोडबंदर रोड, मोघर पाडा तलाव तसेच धर्मवीर आनंद दिघे वाचनालय आणि अभ्यासिकाकशिश पार्क, मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचे नंदनवन, हाजुरी, मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या इमारतीचा विस्तार आदी कामाचे लोकपर्ण आणि भूमीपजून केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनफिट Mohammed Shami, आम्हाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घेऊन जायचा नाही; Rohit Sharma स्पष्टच म्हणाला

Atul Parchure : "खूप चांगला मित्र गमावला" ; अतुल यांच्या अंत्यसंस्कारावेळी निवेदिता यांना अश्रू अनावर

Raju Shetti : 'महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्रपणे लढविणार'; बेळगावात राजू शेट्टींची मोठी घोषणा

Atul Parchure : "तुमच्याबरोबर काम करायचं राहील" ; अर्जुन कपूरने अतुल परचुरेंना वाहिली श्रद्धांजली

Baba Siddique Murder Case: कोण आहेत मोनू अन् गुल्लू? बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखी दोघांना अटक

SCROLL FOR NEXT