अरुण तिवारी  
मुंबई

'वन अविघ्न पार्क'च्या १९ व्या मजल्यावर अरुणसोबत नेमकं काय घडलं?

फायर अलार्म वाजायला सुरुवात झाल्यानंतर अरुण आणि त्याचे सहकारी रहिवाशांची सुटका करण्यासाठी धावले.

दीनानाथ परब

मुंबई: लालबाग येथील 'वन अविघ्न पार्क' (one avighna park fire) इमारतीच्या १९ व्या मजल्यावर काल भीषण आग भडकली होती. या अग्नितांडवामध्ये अरुण तिवारी (arun tiwari) या ३० वर्षीय सुरक्षारक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाला. आगीची घटना घडण्याच्या तासभरआधीच अरुण यांचे उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे राहणारा भाऊ विनय तिवारी यांच्या बरोबर फोनवरुन बोलणं झालं होतं.

त्यावेळी तासाभराने आपण आपल्या भावला इमारतीच्या १९ व्या मजल्यावरुन खाली पडताना पाहणार आहोत, याची कल्पनाही विनय यांनी केली नव्हती. अरुण मागच्या पाच वर्षांपासून 'वन अविघ्न पार्क' इमारतीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करत होता. शुक्रवारी अरुण इमारतीखाली असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयात आपल्या सहकाऱ्यांसोबत बसला होता.

अचानक इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती देणारा फायर अलार्म वाजायला सुरुवात झाली. त्यानंतर अरुण आणि त्याचे सहकारी रहिवाशांची सुटका करण्यासाठी धावले. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर शॉर्ट सर्कीट झाला. त्यामुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.

नेमकं आतमध्ये काय घडलं?

आग लागली त्यावेळी १९ व्या मजल्यावर नेमकं काय घडलं, त्याची माहिती अरुणचा सहकारी योगेशने दिली. "आम्ही फ्लॅट नंबर (१९०२) मधून तीन जणांची यशस्वी सुटका केली. अजून आतमध्ये कोणी अडकलं नाही ना, हे पाहण्यासाठी म्हणून अरुण बाल्कनीमध्ये गेला. पण अचानक आगीचा भडका वाढला आणि अरुण बाल्कनीमध्येच अडकला. त्याला बाहेर पडता आलं नाही. आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण आगीमुळे आम्हाला त्याच्यापर्यंत जाता आले नाही" असे योगेशने सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

आगीच्या ज्वाळा वाढल्यानंतर अरुणने खालच्या १८ व्या मजल्यावरच्या छपरावर उतरण्याचा प्रयत्न केला. पण दुर्देवाने तो जमिनीवर पडला. त्याला लगेच केईएम रुग्णालयात नेण्यात आसे. तिथे डॉक्टरांनी अरुणला मृत घोषित केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

त्याने कधीही माझ्यावर शंका... मृणाल दुसानिसने पतीच्या त्या गोष्टीचं केलं कौतुक, म्हणाली- माझ्याबद्दल पझेसिव्ह असणं

Latest Marathi News Updates live : पुण्यात मित्र पक्षाला एकत्र घेत महायुतीची रणनीती ठरली

Swiggy IPO: स्विगीचा 11,327 कोटी रुपयांचा IPO उघडला; गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचे मत?

IPL Mega Auction 2025: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह २३ भारतीय खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये; कोणाला हाय डिमांड?

SCROLL FOR NEXT