मुंबई : येत्या मंगळवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतल्या लालबागच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात हा सोहळा झाला. विशेष म्हणजे दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारलेली शेवटची भव्यदिव्य आरास इथं पहायला मिळणार आहे. (Lalbuagcha Raja First Darshan See Nitin Chandrakant Desai last Shivrajyabhishek set)
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १२ नोव्हेंबर १९३४ रोजी झाली होती, यंदा २०२३-२४ मंडळाचं ९० वं वर्ष आहे. दरवर्षी या मंडळासाठी चंद्रकांत देसाई भव्यदिव्य असा देखावा सादर तयार करायचे. (Latest Marathi News)
यंदाही त्यांनीच तयार केलेला शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्य आणि आकर्षक आरास तयार करण्यात आली आहे. नुकतेच चंद्रकांत देसाईंचं निधन झाल्यानं ही त्यांची शेवटची कलाकृती ठरली आहे. (Marathi Tajya Batmya)
लालबागच्या राजाचं २४ तास दर्शन भाविकांना घेता येणार आहे. 'लालबागच्या राजा' या मंडळाच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरुन हे गणेशाचं थेट दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.