खारघर : खारघर डोंगरावरील झाडावर मृत अवस्थेत वासरु आढळून आले. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
महत्वाची बातमी : पालघरसह डहाणूत 'निसर्ग' वादळाचे संकट; प्रशासनासह 'एनडीआरएफ' सतर्क
ओवे डोंगरावर ठाणे आणि पनवेल वन विभागाकडून गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात रोप लागवड करून वन संवर्धनाचे काम केले जात आहे. तसेच परीसरातील वृक्ष तोड थांबविण्यासाठी वन विभागाने फणसवाडी, चाफेवाडी, धमोळे आदिवासी पाड्यात वन विभागाने स्वयंपाकसाठी गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण आणि नागरिकांच्या भटकंतीचे प्रमाण खूप कमी झाल्याने हळूहळू डोंगरात मोठ्या प्रमाणात झाडे वाढल्याने डोंगर हिरवेगार दिसत आहे.
खारघरमधून जाणारा डोंगर थेट मुंब्रा डोंगराला मिळतो. गेल्या काही वर्षांत परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे परिसरातील शेतकऱ्यांची गुरे चाऱ्याच्या शोधात डोंगराचा आसरा घेत आहे. त्यात खारघर ओवे डोंगरात एका झाडावर गाईच्या वासरूचा मृतदेह आढळून आला. वासरूला मारून बिबट्या झाडावर घेवून जावू शकतो. त्यामुळे खारघर डोंगरात बिबट्या तर नाही ना अशी चर्चा सुरू आहे.
1990 च्या काळात खारघर डोंगरात बिबटे, वाघ प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहेत. नवी मुंबईची निर्मिती होत असताना इमारत बांधकामामुळे जेसीबी, पोकलनच्या आवाजामुळे जंगली जनावरे निदर्शनास आले नाही.
- बी. टी. पाटील,पर्यावरण प्रेमी खारघर.
खारघरमध्ये बिबट्या निदर्शनास आला नाही. झाडावर असलेल्या गाईच्या वासरूचे छायाचित्र पाहून तपास केला जाईल.
- डी. एस. सोनवणे, वन परिक्षेत्र अधिकारी, पनवेल वन विभाग
Leopard roaming in Kharghar hills read full detail story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.