nana patole sakal media
मुंबई

"तुमची मॅजिक फिगर एकदा लोकांसमोर येऊच द्या"; काँग्रेसचं भाजपला आव्हान

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपनं धनंजय महाडीक यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यसभेसाठी काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीवरुन शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचा उमेदवार हा परप्रांतीय असल्यानं संजय राऊत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर भाजपनंही धनंजय महाडिक यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिली आहे. यावरुन मतांचं गणित उघड असताना भाजपकडून कसला दावा केला जातोय? असा सवाल करत तुमची मॅजिक फिगर एकदा लोकांसमोर येऊच द्या, असं आव्हान पटोले यांनी दिलं आहे. (Let your magic figure come out once in a while Congress challenges BJP)

पटोले म्हणाले, "काँग्रेसची चूक नसली तरी चूक दाखवण्याची परंपरा अलिकडच्या काळात केंद्रातल्या आठ वर्षांच्या कमकुवत सरकारनं चालवली आहे. देश बरबाद केलेल्या गोष्टी लपवण्यासाठी काँग्रेसच्या निर्णयावर कुरघोड्या करण्याचा त्यांचे हे प्रयत्न आहेत. आमचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांनी आज फॉर्म भरला तेव्हा मराठीतून शपथ घेतली. यातून देशाची एकात्मता आणि भाषेला मानणारा उमेदवार दिसून आला, हायकमांड आम्हाला असा उमेदवार दिल्याबद्दल आम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार मानतो"

विरोधकांना दिलं आव्हान

राज्यसभेच्या निवडणुकीला आता जास्त दिवस राहिलेले नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर दिवसाढवळ्या स्वप्न पाहणारे विरोधक आम्ही पाहिले आहेत. त्यामुळं या निवडणुकीत ते ज्या मॅजिक फिगरचा दावा करत आहेत. राज्यसभेचं मतदान ओपनली करावं लागतं त्यामुळं एकदा हे लोकांपुढ येऊच द्या. राज्यसभेच्या निवडणुका शक्यतो बिनविरोधच होतात. त्यामुळं ही मॅजिक फिगर एकदा लोकांपुढे येऊच द्या, पण तरीही विरोधकांचा दावा असेल तर आता मला त्यावर प्रतिक्रिया द्यायची आहे, अशा शब्दांत पटोलेंनी भाजपला आव्हान दिलं आहे.

नगमा यांच्या नाराजीवर दिली प्रतिक्रिया

काँग्रेसनं प्रतापडी यांची उमेदवारी जाहीर केल्यांनतर काँग्रेस नेत्या अभिनेत्री नगमा यांनी नाराजी व्यक्त केली आणि प्रतापडी हे माझ्यापेक्षा जास्त लायक उमेदवार आहेत का? असा सवाल ट्विटरवर विचारला. यावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले, काँग्रेसमध्ये व्यक्तीगत मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. काँग्रेसची ही परंपरा आहे. नाराज असल्यास काँग्रेसमधील नेते बोलतात पण भाजपमध्ये नेते नाराज असले तरी बोलत नाहीत. कारण त्यांच्यामध्ये लोकशाही नाही.

मविआतील समान कार्यक्रमाचा आढावा सुरु

राज्यातील सरकारला अडीचवर्षे पूर्ण होत आहेत तर पुढील अडीच वर्षे अद्याप बाकी आहेत. जेव्हा हे सरकार अस्तित्वात आलं तेव्हा तिन्ही पक्षांसाठी एक सामायिक कार्यक्रम ठरला होता. त्या कार्यक्रमाची पूर्तता होत आहे की नाही याचा आढावा काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी घेणार आहेत, असंही पटोले यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT